Search This Blog

विद्राव्य खतांचा योग्य वापर


विद्राव्य खतांचा योग्य वापर


अन्नद्रव्ये झाडाच्या कोणत्याही भागासाठी लागत असली किंवा कोणत्याही भागावर परिणामकारक असली तरी ती जमिनीतून मिळविण्याची झाडांची नैसर्गिक पद्धत आहे. जमिनीतून रासायनिक खते देणे ही जुनी पद्धत आहे. याचे कारण ते स्वतः उपयोगाच्या दृष्टीने सोईस्कर व त्यांचा नंतर पिकास दीर्घकालीन होणारा फायदा. तसेच मोठ्या प्रमाणात एकाच वेळी खते देऊ शकतो. यामुळे मुख्यत्वे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये हे जमिनीतूनच देणे सोईचे. मात्र, विपरीत परिस्थितीमध्ये हे आपण फवारणीतून पानांद्वारेसुद्धा देऊ शकतो.
पानांद्वारे फवारणीमधून दिल्या जाणा-या मात्रेला बंधने आहेत. ज्या प्रमाणात जमिनीमधून देऊ शकतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारणीतून विद्राव्य खते देणे शक्य नसते. पानांद्वारे दिलेली सर्व अन्नद्रव्ये, घटक पिकाला ताबडतोब उपलब्ध होतात व त्यांचा त्याला थोड्या काळासाठी फायदा होतो. ते दीर्घकाळ फायदा देऊ शकत नाहीत; परंतु रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आपण यांचा अचूक वापर केल्यास निश्चित फायदा होतो.
विद्राव्य खतांमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांना फक्त १९:१९:१९ हाच ग्रेड माहीत आहे व बरेच शेतकरी बहुतांश फवारणीत याचाच वापर करतात. मात्र, पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार वेगवेगळे ग्रेड तयारआहेत. त्या त्या अवस्थेमध्ये ते ग्रेड फवारल्यास सर्वच पिकांमध्ये खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादकता निश्चित वाढेल. एकच एक विद्राव्य खताची फवारणी न करता पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खताचा ग्रेड निवडावा.
तसेच विद्राव्य खतांची फवारणी खालील परिस्थितीमध्ये आवश्यक करावी जसे
* पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणे शक्य न झाल्यास.
* खताच्या डोजला उशीर होत असल्यास.
* जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पिकांना जमिनीमधूनअन्नद्रव्य मिळेनाशी झाल्यास.
* भरपूर पाते-फुले आहेत व त्या प्रमाणात खतांचा पुरवठा नसल्यास.
* कापसाच्या उत्तरार्धात भरपूर बोंडे आहेत व लाल पाने होण्यास सुरुवातझाल्यास.

सर्वच पिकांच्या अवस्थेनुसार शिफारशीत विद्राव्य खतांचे ग्रेड

 • वाढीची अवस्था व विपरीत परिस्थितीमध्ये अन्नद्रव्ये उपलब्ध होतनसल्यास - परिस १९:१९:१९ किंवा २०:२०:२० किंवा युरिया
 • वाढ व फुलोरा सुरुवात - परिस १२:६१:०० किंवा डी.ए.पी.
 • भरपूर फुलोरा व फळधारणा - परिस ०:५२:३४/परिस १३:४०:१३
 • फळधारणा व फळांची वाढ - परिस १३:००:४५ किंवा बिग बी
* प्रमाण ७ ग्रॅम प्रतिलिटर पाणी
* चांगल्या गुणवत्तेचीच विद्राव्य खते वापरावीत.
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर इत्यादी पिकांमध्ये कमी खर्चामध्ये विद्राव्य खतांचे व्यवस्थापन करायचे असल्यास खालीलप्रमाणे वापर करावा.
१) लागवडीनंतर ४०-५० दिवसांनी - परिस १९:१९:१९ किंवा युरिया+ मॅग्नेशियम सल्फेट
२) लागवडीनंतर ५५-६० दिवसांनी - परिस १२:६१:०० किंवा डी.ए.पी.
३) लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी - परिस ०:५२:३४ किंवा डी.ए.पी.
४) लागवडीनंतर ८५-९० दिवसांनी - युरिया + बिग बी
आवश्यकता असल्यास शेवटचा फवारा १० दिवसांनी परत घ्यावा.युरियाचे प्रमाण १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घ्यावे. डी.ए.पी.सुद्धा १० ते १२ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे घ्यावे. डी.ए.पी. पाण्यात विरघळत नसल्याने आपल्याला फवारणीसाठी किती पाणी लागते त्या हिशोबाने डी.ए.पी.चे प्रमाण ठरवून ते रात्री थोड्या पाण्यात टाकून ठेवावे व सकाळी हे पाणी फडक्याने गाळून घेऊन मग वापरावे. सरळ डी.ए.पी. न वापरता त्याची निवळी वापरावी. बिग बीचे प्रमाण ७ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
विद्राव्य खते किंवा डी.ए.पी., युरिया मॅग्नेशियम सल्फेट, बिग बी फवारताना ती कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके यामध्ये मिसळतात किंवा नाही हे तपासून पाहावे. द्रावण घट्ट झाल्यास किंवा फाटल्यास किंवा चांगले एकत्र न झाल्यास याची वेगळी फवारणी करावी. निकृष्ट दर्जाचे विद्राव्य खत असल्यास काही कीटकनाशकांचे पाहिजे तेवढे चांगले परिणाम दिसत नाहीत. म्हणून चांगल्या गुणवत्तेचीच खते वापरावी.

जिवाणू खतांची कार्ये वापर, फायदे व शिफारस


जिवाणू खतांची कार्ये वापर, फायदे व शिफारस


फार काही जुनी गोष्ट नाही. आपले आजोबा, वडील सांगत होते, शेणखताने पीक चांगले येते. पिकावर कीड व रोगसुद्धा कमी येतात; पण काळ बदलला. गुराढोरांची संख्या कमी होऊ लागली तसा शेणखताचा वापरसुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आणि वडीलधा-यांनी सांगितलेल्या गोष्टीला दुजोरा मिळाला. खर्च वाढवूनही उत्पादनात मात्र वाढ होईनाशी झाली. असे का बरे व्हावे ! असे काय असेल या शेणखतात
याचे उत्तर शोधायचा प्रयत्न मात्र शेतक-यांनी केला नाही, हे लक्षात येते. शेणखत असो, कंपोस्ट खत असो, यामध्ये पिकाला लागणा-या १६१७ अन्नद्रव्यांसोबतच अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे अर्थातच जमिनीची उपजाऊ शक्ती वाढविणारे जिवाणू असतात.
परंतु पिकाला आवश्यक असणा-या अन्नद्रव्यांची मात्रा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेणखतामधून आपण पूर्ण करू शकत नाही; परंतु याला पर्याय तर शोधावाच लागेल. याला पर्याय म्हणजे बाजारात उपलब्ध असलेल्या जिवाणू खताचा योग्य प्रकारे वापर ! मग ही जिवाणू खते आहेत तरी काय?
निर्सगाच्या शक्तीला कमी लेखू नका ! निसर्गाने सर्व अडचणींवर उपाययोजना करून ठेवलेलीच आहे. त्याच आधारे बी.टी. तंत्रज्ञानाने नैसर्गिकरीत्या अळीवर नियंत्रण मिळविले गेले. परिणामी, कीटकनाशकाचाएकरी हजारो रुपयांचा खर्च वाचवून आपले होणारे नुकसान तर टळलेच. शिवाय उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडली. हा झाला कीटकनाशकाचा भाग !
यासोबतच आपल्या शेती व्यवसायात रासायनिक खतांचा वापरगैरवापर, नुकसान-फायदे, वारेमाप वाढलेल्या किमती हा एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला; परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अडचणीवर निसर्गाने निसर्गतःच उपाययोजना करून ठेवल्यात. गरज आहे त्या शोधण्याची,
आत्मसात करण्याची ! रासायनिक खतांचा वापर आपणास कमी करता येईल. आपल्या शेती व्यवसायात उत्पादनाच्या २५% खर्च रासायनिक खतावर होत असावा. गैरवापर, अतिरेकी वापर यामुळे आपला उत्पादन खर्च तर वाढतो आहेच. शिवाय जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत आहे. अशातच वारेमाप वाढलेल्या खतांच्या किमती त्यातही तुटवड्यासोबत लिंकिंगसारख्या बाबी ज्यामुळे यावर उपाययोजना शोधणे आज काळाची गरज झाली आहे.
शेती व्यवसायात काही महत्त्वाच्या जिवाणूंची माहिती देत आहोत.

१) अॅझोटोबॅक्टर, रायझोबिएम हे नत्र पुरविणारे जिवाणू योग्य प्रमाणात वापरल्यास नत्राची चांगल्या प्रकारे उपलब्धता होऊन रासायनिक स्वरूपाच्या नत्रावर होणा-या खर्चावर ब-याच अंशी बचत करता येते.

२) पी.एस.बी. (फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया) - स्फुरद उपलब्ध करणारा जिवाणू, स्फुरद हा पिकाला लागणारा महत्त्वाचा घटक, मुळे, फांद्या, फुले, फळे यांच्या विकासात स्फुरदाचा महत्त्वाचा भागअसतो.
रासायनिक खतांच्या माध्यमातून आपण स्फुरदाच्या मात्रेची पूर्तता वेळोवेळी करतो; परंतु जमिनीमध्ये स्फुरद विरघळविणा-या जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. परिणामी स्फुरदाची मात्रा आपण १ (एक) पोत्यावरून ३-४ पोत्यांपर्यंत देऊ लागलो; परंतु पी.एस.बी. जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे वाढविलेल्या खतांचा अपेक्षित परिणाम उत्पादन वाढीमध्ये झालेला दिसत नाही. याचाच अर्थ जमिनीचा जिवंतपणा कायम ठेवण्याकरिता जमिनीमध्ये जिवाणूंची अपेक्षित संख्या आवश्यक आहे.
पी.एस.बी. जिवाणूंचा वापर जमिनीमधून स्फुरदच्या मात्रेत साधारणपणे ३०% पर्यंत कपात करता येते. पी.एस.बी.च्या वापराने जमिनीत असलेले स्फुरद तर उपलब्ध होतेच शिवाय पी.एस.बी.चा जिवाणू जमिनीमध्ये इंडॉल अॅसिटिक अॅसिड, जिब्रेलीन व काही अॅन्टिबॉडीज सोडत असल्याकारणाने मुळांची व पिकाची जोमाने वाढ होते. स्फुरदाची उपलब्धता वाढल्याने सोबत कॅल्शिअम, जस्त व लोह यांचीदेखील उपलब्धता कमालीच्या प्रमाणात वाढते. सर्वच पीकांमध्ये पी.एस.बी. वापरावे.

३) पी.एम.बी. (पोटॅश मोबिलाइझिंग बॅक्टेरिया) - आपल्या जमिनीमध्ये पोटॅशची मात्रा भरपूर आहे, असे कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आलो; परंतु असे असूनही पोटॅशवरील खर्च दिवसेंदिवस वाढत चालला आहे. जमिनीत असलेल्या पोटॅशपैकी बराच पोटॅश सिलिकेट मिनरलच्या स्वरूपात असतो. सिलिकेट मिनरलला ऑरगॅनिक अॅसिडद्वारे विघटन करून पिकास उपलब्ध करून देता येते. त्याकरिता पोटॅशच्या जिवाणूंचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पोटॅश खर्चावर ब-याच अंशी कपात येते व जमिनीची सुपीकतादेखील वाढते. पी.एम.बी. सुद्धा सर्वच पीकांमध्ये वापरावे.
मुख्य अन्नद्रव्ये (एन.पी.के.)चा पुरवठा करणा-या जिवाणूंव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाच्या जिवाणूंची संक्षिप्त माहिती खाली देत आहोत.

४) सुडोमोनास - हा बॅक्टेरिया शेती व्यवसायात निसर्गाने दिलेले वरदान म्हणावे लागेल. हा बॅक्टेरिया, बुरशीजन्य सर्व प्रकारचे रोग तसेच जिवाणूजन्य रोग, विषाणूजन्य रोग इत्यादींवर प्रभावीपणे कार्य करतो. या बॅक्टेरियाद्वारे अनेक रोगांवर नियंत्रण तर मिळविले जाते. शिवाय या बॅक्टेरियाला प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटिंग बॅक्टेरिया म्हणूनसुद्धा उपयोगात आणतात. याची उपयोगिता प्रत्येक शेतक-याने जाणून घेणे गरजेचे वाटते.

५) बिव्हेरिया बॅसियाना - हा जिवाणू विविध अळ्या, रसशोषक किडी, पांढरी माशी, मिलीबगसुद्धा प्रभावीपणे नियंत्रणात आणतो.

६) व्हटिसिलिएम लिकेणी - विविध किडींवर नियंत्रण ठेवणारा जिवाणू म्हणून प्रचलित.

७) मेटॅरायझिएम - जमिनीत उधळी, ह्युमनीसारख्या किडीवर उत्कृष्ट नियंत्रण,

८) ट्रायकोडर्मा - तूर, हरभरा, भुईमुग यांचा मररोग सर्व प्रकारचे मुळकूज व सर्वच पिकांमध्ये विविध प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर कार्य करते, योग्य पद्धतीने वापर केल्यास रासायनिक बुरशीनाशकापेक्षा फायदेशीर. शेणखत कंपोस्ट खत कुजवण्यास उपयुक्त.

जिवाणू खते/संवर्धके वापरताना घ्यावयाची काळजी
·         शक्यतोवर (फ्रेश) उत्पादन, तारीख जवळचीच असलेले. अंतिमतारखेच्या बरेच आधीचे जिवाणू पाकिटे वापरावीत.
·         यांची साठवण दुकानामध्ये किंवा घरी थंड ठिकाणी रसायनांपासून दूर कोरड्या ठिकाणी केलेली असावी.
·         जिवाणू खते बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया झाल्यानंतर वापरावीत.
·         रासायनिक खतांसबोत जिवाणूसंवर्धक मिसळू नये
·         विद्यापीठ किंवा खात्रीच्या कंपनीचेच व खात्रीच्या विक्रेत्यांकडून जिवाणू खते घ्यावीत. जिवाणू खते उत्पादन करणाच्या काही नामांकित कंपन्या Booster, I.P.L., Microbax, Margo, IPM

जिवाणू खतांची बीजप्रक्रिया कशी करावी
जिवाणू खते पावडर व लिक्विड स्वरूपात उपलब्ध आहेत. साधारणतः बीजप्रक्रिया किंवा ड्रेचिंग (बुडाशी टाकणे) या दोन पद्धतीने याचा वापर करतात. बीजप्रक्रियेसाठी पावडर स्वरूपातील २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास व द्रवरूप १० ते २० मिली प्रतिकिलोस लावतात.
प्रत्येक तेलबिया व द्विदल धान्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रायझोबियम वापरावे व सर्वांसाठी पी.एस.बी.सुद्धा वापरावे. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी ट्रायकोडर्मा वापरावे. म्हणजे १ किलो सोयाबीन किंवा तूर किंवा हरभरा किंवा इतर बियाण्यासाठी
ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे - बुरशीजन्य रोग
रायझोबियम २५ ग्रॅम किंवा १० ते २० मिली प्रतिकिलोस
पी.एस.बी. २५ ग्रॅम किंवा १० ते २० मिली प्रतिकिलोस
वापरण्यास हरकत नाही. वरील जिवाणू एका घमेल्यात घेऊन त्यात आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून सोबत चिकटपणासाठी गूळ किंवा डिंक टाकावा व हे मिश्रण बियाण्यावर शिंपडून सर्व बियांना लागेल असे सावकाश चोळून बियाणे सावलीत २, ३ तास सुकवून पेरणी करावी.काही कारणास्तव जिवाणू खतांची बीजप्रक्रिया न केल्यास १ किलो रायझोबियम, १ किलो पी.एस.बी. व १ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या शेणखतामध्ये मिसळून द्यावे. त्यावर पाणी टाकून काही दिवस गोणपाटाने झाकावे व पहिल्या डवरणीच्या आधी शेतात सारखे पसरून द्यावे. जास्त एकरामध्ये करण्यासाठी सर्वांचेच प्रमाण जास्त घ्यावे.
कापसासाठी बीजप्रक्रिया न करता जिवाणूंचे ड्रेचिंग करावे किंवा ठिबकद्वारे जिवाणू सोडावेत. त्यासाठी साधारणतः
अॅझाटोबॅक्टर - १ किलो किंवा २५० मिली+पी.एस.बी.-१ किलो किंवा २५० मिली
ट्रायकोडर्मा - १/२ किलो किंवा २५० मिली
हे प्रमाण एक एकर कापसासाठी वापरावे. डॅचिंगसाठी किमान १० पंप वापरल्यास प्रतिपंप १०० ग्रॅम किंवा २५ मिली जिवाणू खते वापरावीत. जमिनीमध्ये ओलावा असताना व लागवड झाल्यानंतर शक्य तेवढ्या लवकर या जिवाणूंचा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये ब-याच प्रमाणात बचत होऊ शकते.
फळझाडे व इतर सर्वच पिकांमध्ये जिवाणू खतांचा वापर फायद्याचा आहे. आतापर्यंत शेतक-यांनी याकडे लक्ष दिले नाही याची अनेक कारणे आहेत. जशी रासायनिक खतांच्या कमी किमतीमध्ये उपलब्धता, निकृष्ट दर्जाची जिवाणू खते. वापराबद्दल शास्त्रीय माहितीचा अभाव, विश्वासपात्र उत्पादने. मात्र, आता जिवाणू खतांचा वापर ही काळाची गरज झाली आहे. याचा योग्य वापर करून आपला फायदा करून घ्यावा.

जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय


जमिनीची सुपीकता वाढीचे उपाय

उत्पादन वाढीच्या शर्यतीमध्ये आपण जमिनीचा विचार केलाच नाही. आता पूर्वीसारखी जमीन सुपीक राहिली नाही. कारण तिच्याकडून फक्त घेणेच चालू आहे. तिला दिला जाणारा मोबदला जसे शेणखत, सेंद्रिय खत, हिरवळीचे खत इत्यादी हे अत्यल्प किंवा देणे बंदच झाले. फक्त जास्तीत जास्त उत्पादन कसे काढावे याचेच समीकरण आपण बांधत आहोत. पूर्वी ज्या जमिनीमध्ये सेंद्रिय कर्बाचे प्रमाण १% पर्यंत असायचे ते आता ०.६५% पर्यंत आलेले आहे. याच प्रकारे भविष्यातही आपण जमिनीची काळजी घेतली नाही, तर कितीही रासायनिक खत दिले तरी उत्पादन येण्याची खात्री नाही. कारण दिलेले रासायनिक खत त्याच स्वरूपामध्ये पिकांना मिळत नाही. त्याचे स्वरूप बदलून देण्याचे काम जिवाणू करतात व त्या जिवाणूंचे खाद्य सेंद्रिय पदार्थ आहेत. हे सेंद्रिय पदार्थ शेणखत, हिरवळीचे खत, गांडूळ खत, सेंद्रिय खत, निंबोळी पेंड इत्यादींमध्ये आहे. त्यामुळे यापैकी कुठल्याही सेंद्रिय पदार्थांचा वापर करून आपण जमिनीची सुपीकता वाढवू शक्यतो. खालील काही पर्याय दिले आहेत त्यापैकी आपणास शक्य तो पर्याय निवडून जमिनीच्या सुपीकतेकडे व रासायनिक खतांच्या उपलब्धेकडे लक्ष द्यावे. 

१) पिकाची फेरपालट (एकच पीक सतत एकाच शेतात न घेता त्या ठिकाणी पिकाचा फेरपालट करावा.)
२) पालापाचोळा, कचरा, पीकाचे अवशेष ओलाव्यात गाडणे. (शेतातील पिकाचे अवशेष जसे पालापाचोळा, पन्हाट्या व इतर जमिनीमध्ये ओलावा असताना गाडावा.
३) शेणखताचा रासायनिक खतासोबत वापर. (शक्य होईल तेवढे चांगले कुजलेले शेणखत वापरण्याचा प्रयत्न करावा. नसता किमान थोडे तरी शेणखत रासायनिक खतासोबत वापरावे. त्यामुळे रासायनिक खतांची उपलब्धता वाढते.)
४) रासायनिक खतांच्या मात्रा जास्त भागांमध्ये विभागून देणे. (दिलेले रासायनिक खत हे ५०% पेक्षा जास्त उपलब्ध होत नाही. त्याची उपलब्धता वाढवण्यासाठी खत हे जास्त भागामध्ये विभागून द्यावे.)
५) चांगल्या गुणवत्तेच्या ह्युमिक अॅसिडचा खतासोबत वापर. (ह्युमिकअॅसिडमध्ये ह्युमस नावाचा घटक असतो. ज्यामुळे जमिनीची सुपीकता वाढते व पांढ-या मुळांची संख्या वाढते. चांगले गुणवत्तेचे ह्युमिक अॅसिड पिकांना द्यावे.)
६) जिवाणू खतांचा वापर. (बाजारामध्ये वेगवेगळ्या नत्र, स्फुरद, पालाश व इतर अन्नद्रव्य उपलब्ध करून देणारे जिवाणू मिळतात. त्यातील चांगल्या गुणवत्तेच्या व फ्रेश जिवाणूंचा वापर सर्व पिकांसाठी दरवर्षी करावा.)
७)रासायनिक खतांचा संतुलित वापर. (रासायनिक खतांची उपलब्धता वाढविण्यासाठी संतुलित खतांचा वापर करावा.)

८) विद्राव्य खतांचा वापर. (गरजेनुसार योग्य ग्रेडच्या विद्राव्य खतांचा वापर करावा.)

खतांच्या वापराबाबतचे महत्त्वाचे मुद्दे
खते विकत घेताना दर किलो पोषक द्रव्याला काय किंमत पडते ते पाहणे आवश्यक आहे. ज्या खतात हा खर्च कमी येईल ते विकत घेणे आर्थिकदृष्ट्या फायद्याचे ठरेल. चुनखडी असलेल्या जमिनीत अमोनियम सल्फेट किंवा युरिया जमिनीच्या पृष्ठभागावर दिल्यास बराचसा नत्र हवेत उडून जातो, म्हणून ही अथवा इतर नत्रयुक्त खते जमिनीत टाकल्यास ती मातीत मिसळावीत. तसेच चुनखडी जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेटचा वापर टाळावा. त्याऐवजी डी ए पी किंवा इतर खते वापरावीत व पीक पिवळे होत असल्यास झिंक सल्फेट व फेरस सल्फेट एकरी ५ किलो पेरणीसोबत द्यावे. पाऊस सुरू असताना युरियाऐवजी अमोनियम सल्फेट देणे अधिक फायदेशीर ठरते. खते बियाण्यासोबत मिसळून पेरल्यास बियाण्याला अपाय होण्याची शक्यता असते, म्हणून ती बियाखाली व बियांच्या बाजूला ५ सें.मी. खोल पेरून द्यावीत. बी उगवल्यानंतर त्याची मुळे खतापर्यंत पोहोचतात व खतातील अन्नद्रव्यांचे शोषण करतात. नत्रयुक्त खते एकदाच न देता अर्थी मात्रा पेरताना व उरलेली अर्थी मात्रा वरखत म्हणून पेरणीनंतर एक किंवा दोन हप्त्यांत विभागून शिफारशीप्रमाणे द्यावी. वरखते पिकाच्या ओळींमधून अथवा रोपाभोवती द्यावीत. मातीपरीक्षण केल्यानंतर विदर्भ व मराठवाड्यातील बहुतांश जमिनीमध्ये पालाशचे भरपूर प्रमाण आढळते. हा पालाश उपलब्ध स्वरूपात नसल्यामुळे आपणास पालाश वरखताच्या माध्यमातून देणे गरजेचे आहे.

कम्पोस्ट खड्याची (उकंड्याची) जागा व त्याचा आकार
खताच्या खड्याची जागा शक्यतो जनावरांच्या गोठ्याजवळ उंच असावी. पावसाचे पाणी खड्यात जाऊन परत बाहेर जाऊ नये. त्यासाठी खड्याभोवती १०-१५ सें.मी. उंचीचा बांध घालणे चांगले. कचरा कुजण्याचीक्रिया सूक्ष्म जिवाणूद्वारे होत असते आणि त्यांची वाढ होण्याकरिता आवश्यक तो ओलावा व उष्ण तापमान लागते. त्यासाठी गरजेनुसार जवळच पाणी उपलब्ध असावे. पावसाळ्यात पावसाचे पाणी खताच्या खड्यात जाऊन त्यातून वाहू नये याची काळजी घ्यावी. वर्षात दोन वेळेस खड्यात पाणी भरल्यास कुजण्यास मदत होते.
सर्वसाधारणपणे कंपोस्ट खड्डा किंवा उकंडा २ मीटर रुंद, १ मीटर खोल असावा. लांबी मात्र आवश्यकतेनुसार ५ ते १० मीटरपर्यंत ठेवावी. २ खड्यामध्ये २ मीटर अंतर असावे. खड्याचा तळ व बाजू थोड्या ठोकून टणक कराव्यात.

गांडूळ खत
रासायनिक खताला पर्याय आणि जमिनीची सुपीकता वाढविण्यासाठी गांडूळ खताचा वापर करणे योग्य आहे.

गांडूळ खत (व्हर्मी कंपोस्ट) म्हणजे काय?
यामध्ये गांडुळाची विष्ठा, नैसर्गिकरीत्या कुजलेले पदार्थ, गांडुळाचे अंडीपुंज (ककुन्स), त्यांच्या बाल्यावस्था आणि अनेक उपयुक्त जिवाणूंचा समावेश असतो.

गांडूळ खत तयार करण्याची सुलभ पद्धत
गांडूळ खत तयार करण्याच्या अनेक पद्धती आहेत. त्यापैकी शेतात किंवा गोठ्याच्या आवारात तात्पुरते छप्पर उभारून जमिनीवर गादी वाफे तयार करून त्यात मोठ्या प्रमाणात गांडूळ खताची निर्मिती करता येते. यामध्ये आयसोनिया फिटिडा किंवा युड्रिलस युजेनिया या पृष्ठभागावर कार्य करणाच्या गांडुळाच्या जातींचा वापर करण्यात येतो.
सामुग्री : या पद्धतीमध्ये हवेशीर; परंतु गांडुळाचे उन्हापासून आणि पावसापासून संरक्षण करण्यासाठी साध्या गवती किंवा बांबूच्या ताट्यांपासून तयार केलेल्या तात्पुरते छप्पराची आवश्यकता असते. पावसाळ्यात आत पाणी शिरू नये म्हणून छप्पराला प्लास्टिक किंवा ताडपत्री लावणे आवश्यक
आहे. त्याचप्रमाणे गांडूळ खत निर्मितीसाठी गांडुळाचे आवडते खाद्य उदा. गुराढोरांचे शेण, बकन्या आणि मेंढ्यांच्या लेंड्या, घोडा-गाढवांची लीद, शेतातील निरुपयोगी सेंद्रिय पदार्थ, पालापाचोळा, भाज्या आणि फळांचे टाकाऊ भाग तसेच वाचलेले अन्नपदार्थ इत्यादी जमा करावेत, ही पूर्वतयारी केल्यानंतर गांडूळखत निर्मितीसाठी खालील पद्धत अमलात आणावी.

१) गांडुळासाठी गादी वाफे (बेड) तयार करणे
तात्पुरते छप्पर उभारल्यानंतर त्याखालील जागेवरील माती ५ ते ६ सें.मी. खोदून मोकळी करावी. त्यावर ७ ते १० सें.मी. उंचीचा पाऊण ते एक मीटर रुंद आणि आवश्यकतेनुसार लांबीचे एक किंवा अनेक गादी वाफे तयार करावेत. दोन वाफ्यांमध्ये साधारणपणे ३० सें.मी. अंतर ठेवावे. गादी वाफा तयार करण्यासाठी उसाची वाळलेली पाने, चिपाड, वाळलेले गवत, पालापाचोळा किंवा शेतातील इतर टाकाऊ सेंद्रिय पदार्थ यांचा प्रथम ५ ते ६ सें.मी. जाडीचा थर द्यावा. त्यावर कुजलेल्या शेणखताचा पातळ थर द्यावा. अशा त-हेने तयार केलेले गादी वाफे वर्षभर वापरता येतील.

२) गांडुळासाठी खाद्यपदार्थांचे मिश्रण तयार करणे
हे मिश्रण छपराच्या बाहेर मोकळ्या जागेत तयार करावे. त्यासाठी ४ ते ५ दिवसांपूर्वी गोळा केलेले गुराढोरांचे शेण किंवा इतर प्राण्यांची विष्ठा अर्धा भाग आणि घरादारांतील किंवा शेतातील टाकाऊ सेंद्रिय पदार्थ अर्धा भाग घेऊन ते फावड्याच्या साहाय्याने एकत्र मिसळावे. त्यावर थोडे पाणी टाकून,गोवाया थापता येतील इतपत खाद्यमिश्रण मऊ करावे.

३) खाद्यपदार्थांचे मिश्रण गादी वाफ्यावर टाकणे
तयार केलेले खाद्यमिश्रण लहान घमेल्याच्या साहाय्याने गादी वाफ्यावर टाकावे. त्यासाठी प्रथम दोन घमेले वाफ्यावर पालथे घालून, हे दोन्ही ढीग एकमेकाला जोडून राहतील याची काळजी घ्यावी. त्यानंतर पुन्हा एक घमेले दोन्ह ढिगांच्या मधोमध वरील बाजूला टाकून तिसरा ढीग टाकावा. अशा रीतीने लांबीच्या दिशेने खाद्यमिश्रण टाकत जावे.

४) खाद्यमिश्रणावर गांडूळ किंवा ताजे गांडूळ खत टाकणे
साधारणपणे प्रत्येक पाच घमेले खाद्यमिश्रणावर १०० गांडूळे किंवा १ किलो ताजे गांडूळ खत (अंडी/पिल्लेयुक्त) टाकावे.

५) खाद्यमिश्रणावर गवत किंवा जुनाट पोत्याचे आच्छादन टाकावे
गादी वाफ्यावर खाद्यमिश्रण टाकून झाल्यावर त्याच्या सर्व बाजू झाकण्यासाठी वाळलेले गवत किंवा जुनाट पोत्याचा वापर करावा. त्यामुळे मिश्रण ओलसर राहील आणि पक्ष्यांपासून गांडुळांना संरक्षण मिळेल. हे
आच्छादन मधूनमधून बाजूला सारून खाद्यमिश्रणात गांडुळाची वाढ होते किंवा नाही हे पाहावे. शिवाय आत गांडुळाचे नैसर्गिक शत्रू (उदा. बेडूक, उंदीर, साप, पाली वगैरे) आढळल्यास त्यांचा बंदोबस्त करावा.

६) खाद्य : खाद्यमिश्रण माफकपणे ओलसर ठेवण्यासाठी उन्हाळ्यात किमान दोन वेळा (सकाळी व संध्याकाळी) आणि इतर दिवसांत एक वेळा झारीने (आच्छादनावर) पाणी घालावे. हे पाणी वाफ्याच्या आजूबाजूला उतरणार नाही याची काळजी घ्यावी.

७) गांडूळ खत तयार झाल्यानंतर त्यापासून गांडूळ वेगळे करणे
या पद्धतीप्रमाणे गांडूळ खत तयार होण्यासाठी सुरुवातीला ४० ते ४५ दिवस लागतात. पुढे हा कालावधी कमी होतो. शेवटच्या ४ ते ५ दिवसांत खाद्यमिश्रणावरील आच्छादन बाजूला काढून पाणी टाकणे बंद करावे. जसजसे गांडूळ खत कोरडे होत जाईल तसतसे गांडूळ गादी वाफ्यात शिरतील. त्यानंतर कोरडे खत गोळा करून ते रेती गाळण्याच्या चाळणीने (२.५ मि.मी.) गाळून घ्यावे. चाळणीवर जे गांडूळ जमा होतील त्यांचा पुन्हा खत निर्मितीसाठी वापर करावा. गांडूळ खताचा विविध पिकांसाठी जोरखत म्हणून उपयोग करावा.

हिरवळीचे खत
जमिनीची उत्पादकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खताची फार गरज आहे; परंतु त्याची उपलब्धता दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहे. अशा परिस्थितीमध्ये जमिनीची सेंद्रिय खताची गरज भागविण्यासाठी हिरवळीची खते शेतीला व शेतक-यांना वरदान ठरू शकतात. हिरवळीच्या खतांचे पीक शेतात मिश्र किंवा एखाद्या मुख्य पिकात आंतरपीक म्हणून किंवा हिरवळीचे मुख्य पिक म्हणूनही घेतले जाते व पीक फुलो-यावर असताना जमिनीत गाडले जाते. हिरवळीचे खत म्हणजे शेतात वाढलेल्या हिरव्या वनस्पती किंवा पानांसह कोवळ्या फांद्या जमिनीत गाडणे होय. ही पिके जमिनीत अन्नपुरवठ्याबरोबरच तिचे भौतिक व रासायनिक गुणधर्म सुधारण्यास मदत करतात. 

हिरवळीच्या खताचे प्रकार
१)       हिरवळीच्या खताचे पीक शेतात वाढवून फुलो-यापूर्वी ते जमिनीत गाडणे. (उदा. ताग/बोरू, धैंचा, चवळी इत्यादी)
२)       हिरवळीच्या खताचे पीक शेताबाहेर बांधावर किंवा पडीक जमिनीवर वाढवून त्याच्या कोवळ्या फांद्या व पाने शेतात आणून जमिनीत मिसळणे/ गाडणे. (उदा. गिरीपुष्प, सुबाभूळ, शेवरी इत्यादी)

बोरू
बोरू हे पीक उत्कृष्ट हिरवळीचे खत आहे. हे पीक शेंगवर्गीय द्विदल वर्गातील असल्यामुळे त्याच्या मुळावर असंख्य नत्र शोषण करणाच्या जिवाणूच्या गाठी असतात. या झाडांची उंची १२ ते ३.० मीटर असून, बुंध्याची जाडी २.० सें.मी.पर्यंत असते. झाडाला भरपूर पाने असतात. फुले पिवळ्या रंगाची असतात. हे फारच जोमाने वाढते.
पीक जमिनीत गाडल्यानंतर कुजन हेक्टरी ५० ते ६० किलो नत्राचे स्थिरीकरण होते. झाडाच्या सेंद्रिय पदार्थात ०.८% नत्र, १% स्फुरद व ०.५% पालाश असते. या पिकाचे वैशिष्ट्य म्हणजे पानासहित संपूर्ण झाड लवकर कुजते. 

लागवड तंत्र
खरीप व बागायती असल्यास रबी व उन्हाळ्यात पेरू शकतो.

मशागत : शेतीची मुख्य पिकासाठी नेहमीप्रमाणे खोल नांगरट करून वखराच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी.

पेरणीची वेळ : कोरडवाहू परिस्थितीत पहिला पाऊस पेरणीयोग्य झाल्यानंतर ताबडतोब पेरणी करावी. कोणत्याही परिस्थितीमध्ये उशिरा करू नये; अन्यथा मुख्य पिकास उशीर होऊ शकतो. जमिनीत पुरेसा ओलावा अत्यंत आवश्यक आहे.

पेरणी पद्धत : पेरणी सरत्याने किंवा तिफणीने करावी. दोन ओळींमध्ये अंतर ३० सें.मी. ठेवावे. बी जमिनीत ३ ते ४ सें.मी. खोलीवर पेरावे. पेरणी उताराला आडवी करावी. फेकीव पद्धतीने पेरणी टाळावी. ओलिताची उपलब्धता असल्यास चांगले ओलित देऊनसुद्धा पावसाळ्यापूर्वी लागवड करता येते.

बियाण्याचे प्रमाण : पेरणीसाठी एकरी १० ते १५ किलो बियाणे वापरावे. पेरणीसाठी जुने बी वापरू नये. बियाण्यास रायझोबियम जिवाणू खताची बीजप्रक्रिया केल्यास उत्तम.

खतव्यवस्थापन : सेंद्रिय शेती पद्धतीत कोणत्याही प्रकारचे रासायनिक खत वापरू नये. एकात्मिक अन्नद्रव्यव्यवस्थापन पद्धतीत पेरणीच्या वेळी एकरी २५ किलो डी ए पी दिल्यास मुळांची व त्यावरील गाठींची योग्य प्रमाणत वाढ होऊन पीक जोमाने वाढते.

आंतरमशागत व ओलितव्यवस्थापन : या पिकास विरळणी, आंतरमशागत व तणनियंत्रण करण्याची आवश्यकता नाही. सहसा खरीप हंगामात ओलिताची गरज भासत नाही.

बोरू जमिनीत गाडणे/दाबणे : पीक फुलो-यात येण्यास सुरुवात झाल्यानंतर किंवा पेरणीपासून ४० ते ५० दिवसांनी नांगराने किंवा ट्रैक्टर जमिनीत चांगल्या प्रकारे गाडले जाईल या पद्धतीने दाबावे. झाड लुसलुशीत असल्यामुळे एका आठवड्यात जमिनीत कुजते.

ढेंच्या
ढेंच्याशेंगवर्गीय द्विदल वर्गातील पीक असून, ते जलद वाढते. त्याच्या मुळ, खोड व फांद्यांवर गाठी असतात व त्या हवेतील नत्र स्थिरीकरणाचेकाम करतात. हे पीक बोरूच्या तुलनेत विविध प्रकारच्या जमिनीत घेतायेते.

पेरणीची वेळ : पेरणीसाठी योग्य पाऊस पडल्यानंतर (५०-६० मि. मी.) ओलावा फायदा मिळविण्यासाठी ताबडतोब पेरणी करावी. बागायतीमध्ये रबीतसुद्धा घेऊ शकाल.

पेरणीची पद्धत : पेरणी सरत्याने करताना त्यात माती किंवा बारीक रेती मिसळावी. दोन ओळीतील अंतर ३० सें.मी. राखावे. बी खोलीवर पेरू नये. पेरणी उताराला आडवी आणि शक्यतो पूर्व-पश्चिम दिशेने करावी.

बियाण्याचे प्रमाण : पेरणीसाठी एकरी १० ते १५ किलो बियाणे वापरावे.

खतव्यवस्थापन : ऊँचाची पेरणी करताना डी ए पी २५ किलो एकरी खताची मात्रा द्यावी. त्यामुळे पिकांची मुळे चांगल्या प्रकारे वाढल्याने पीक जोमाने वाढते.

आंतरमशागत व ओलितव्यवस्थापन : पेरणीनंतर १५ दिवसांनंतर हे पीक जलद व जोमाने वाढत असल्यामुळे तणव्यवस्थापनासोबत विरळणी, आंतरमशागतीची आवश्यकता नाही.

      बैंचा जमिनीत गाडणे व दाबणे : पेरणीनंतर ४० ते ४५ दिवसांत बैंचाची सर्वसाधारण वाढ होते. ते १०० ते १२५ सें.मी. उंच वाढल्यानंतर नांगराच्या किंवा ट्रॅक्टरच्या साह्याने त्यास जमिनीत गाडावे.

उडीद मूग व्यवस्थापन


उडीद मूग व्यवस्थापन

उडीद व मूग या कडधान्याचे मागील काही वर्षांतील बाजारभाव पाहता व याचा भविष्याचा विचार करता ही पिके फायद्याची ठरू शकतात. लवकर येतात, उत्पादन खर्च कमी, रबी पिकासाठी शेत लवकर खाली. या फायद्यांसोबतच काही अडचणीसुद्धा आहेत. त्या म्हणजे पेरणीस जास्त उशीर झाल्यास उत्पादनात मोठी घट येते. काढणीच्या वेळेस पाऊस असेल किंवा मजूर न मिळाल्यास तोंडी आलेला घास जाऊ शकतो. यलो मोझेंकने मोठे नुकसान होऊ शकते; परंतु काही क्षेत्रांत याचा प्रयोग करण्यास हरकत नाही किंवा यांचे क्षेत्र असावे ज्यामुळे जोखीम कमी होते.

वाणाची निवड : टी.ए.आर.एम.- ०२, ९८ कोपरगाव मूग व उडदामध्ये टीएयु-१, टीएयू-२, पी.के.व्ही.-१५ किंवा खाजगी कंपनीच्या जाती पेराव्यात.

एकरी बियाणे, बीजप्रक्रिया : उडीद व मूग दोन्ही पिकांचे ५ किलो बियाणे प्रतिएकरप्रमाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्याला रायझोबियम व ट्रायकोडर्मा या जिवाणूंची बीजप्रक्रिया करावी. मान्सून वेळेत आल्यास जून महिन्यात पेरणी झाल्यास उत्पादनात वाढ होते. सर्वांत पहिले मूग व उडदाची पेरणी करावी.

खतव्यवस्थापन : फार लवकर येणरी पिके असल्याने पेरणीसोबत २०:२०:००:१३ किंवा २४:२४:०० किंवा डी.ए.पी. पेरावे. नंतर खत देण्याची आवश्यकता नाही.

आंतरमशागत व तणनाशकाचा वापर : फूल लागण्यापूर्वी डवरणी करावी. गरजेनुसार निंदण करावे किंवा जमिनीत ओलावा असताना इमॅथिथायपर (परस्यूट) तण १-२ इंचाचे असताना फवारावे. सोबत शॉकअब वापरावे.

कीड व रोगव्यवस्थापन : रसशोषक किडींपैकी मावा, मुंगे, पांढरी माशी ही कीड उडीद, मुगावर आढळते. पैकी मावा सुरुवातीला आढळतो. शेंड्यावर व शेंड्याच्या पानातील रस शोषल्याने वाढ खुटते. पांढरी माशी, यलो मोनॅकचा प्रसार करते. म्हणून दोन्ही किडींना वेळीच नियंत्रित करावे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड किंवा डायमेथोएट किंवा असिटामाप्रीड फवारावे किंवा सोबत हिरवी उंट अळी/तंबाखूची पाने खाणारी अळी/स्पंजीड अळी असल्यास ट्रायझोफॉस डेल्टामेथ्रीन/ प्रोफेनोफॉस सायपर/ क्लोरोसायपर यापैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे. यासोबत रसशोषक किडीचे वेगळे घेण्याची गरज नाही. मात्र, फुलोरा अवस्था असल्यास १२:६१ + झेप व शेंगा अवस्था असल्यास १३:००:४५ + भरारी द्यावे.

भुरी रोग : पानांवर पांढ-या रंगाची बुरशी आढळते. तीव्रता जास्त असल्यास पाने, फांद्या व फुलांवर सगळीकडे पसरते व पाने, फुले गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी कॅराथेन - १० मिली / टोपाझ - ५ मिली/ सल्फर-४० ग्रॅमपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी करावी. गरज भासल्यास १० दिवसांनी परत फवारणी करावी.

यलो मोनॅक : एकदम सर्व पाने पिवळी होतात व त्याचे प्रमाण पहिल्या दिवशी ५ झाडे दुस-या दिवशी ५०, तिस-या दिवशी ५०० एवढे जोरात वाढते. याचा प्रसार रसशोषक किडीमुळे होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोडेल्टा-४० किंवा असिटामाप्रीड-१२ ग्रॅम ताबडतोब फवारावे किंवा लागवडीपूर्वी रिहांशची बीजप्रक्रिया करावी.

भुईमूग व्यवस्थापन


भुईमूग व्यवस्थापन


भुईमूग हे तेलवर्गीय महत्त्वाचे पीक आहे. काळाच्या ओघात ते अन्नपीक म्हणूनसुद्धा वाढीस लागले आहे. या पिकात निरनिराळ्या हवामानांत जुळवून घेण्याची क्षमता आहे. तसेच हे पीक फेरपालट, आंतरपीक, जमिनीची सुपीकता वाढवणे व जनावरांचा उत्तम चारा यासाठीसुद्धा फार उपयुक्त आहे. विदर्भ, मराठवाड्यातील शेतक-यांनी काही प्रमाणात तरी याची लागवड करण्यास सुरुवात करावी.

वाण: टीएजी-२४, टी.जी.-२६, एस.बी.-११, जे.एल.-२६ यापैकी किंवा अनुभवातील खात्रीचे वाण लावावे.
बियाण्याचे प्रमाण : सर्वसाधारणपणे एकरी ४० ते ५० किलो बियाणे पेरणीकरिता लागते.
बीजप्रक्रिया : पेरणीपूर्वी कार्बडायझीम किंवा मेन्कोझेव ३ ते ५ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करून नंतर ट्रायकोडर्मा ६ ग्रॅम प्रतिकिलोप्रमाणे बीजप्रक्रिया करावी.

पेरणीची वेळ :
खरीप : जून महिन्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्यानंतर लवकरात लवकर किंवा धूळपेरणी करावी.
रबी : सप्टेंबर शेवटचा आठवडा ते १५ ऑक्टोबरपर्यंत.
उन्हाळी : जानेवारीमध्ये १५ तारखेच्या आसपास थंडी कमी झाल्याबरोबरपेरणी करावी. 

पेरणीची पद्धत : पेरणी लागवड रुंद वरंबा सरी पद्धतीने किंवा सरी-वरंबा पद्धतीनेच करावी. ३० x १० किंवा ३० x १५ किंवा ४५ x १० सें.मी. अंतरावर वाणपरत्वे एका ठिकाणी एकच बी टाकून करावी.

खाडण्या भरणे : शक्यतो खाडण्या पडणार नाहीत असे पाहावे; पण असल्यास उगवणीनंतर ताबडतोब १० दिवसांच्या आत खाडण्या भराव्यात.

आंतरमशागत : पीक वाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेत म्हणजे ६ ते ७ आठवड्यांपर्यंत आंतरमशागत करून शेत भुसभुसीत ठेवावे. एक-दोन वेळा निंदणी करावी. शेवटच्या डवरणील पिकाला मातीची भर द्यावी किंवा ८-९ आठवड्यांचे पीक झाल्यानंतर पिकावर ड्रम फिरवावा. आच्या सुटल्यानंतर आंतरमशागत करू नये.

तणव्यवस्थापन : निंदणी करून ६ ते ७ आठवडे शेत तणविरहित ठेवावे किंवा तणनाशकाचा वापर करावा. पेरणीनंतर ४८ तासांच्या आत स्टॅम्प किंवा गोलपैकी एक तणनाशक शिफारशीत मात्रेने जमिनीवर फवारावे किंवा तण १-२ इंचाचे असताना इमॅझिथायपर (परस्यूट) २५० मिली प्रतिएकर जमिनीत ओल असताना सोबत शॉक-अब एकरी ५०० मिली वापरावे. 

ओलितव्यवस्थापन :
खरीप : नाजूक अवस्थेमध्ये पावसाचा खंड पडल्यास ओलित करावे. पेरणीनंतर ६० ते ७० दिवसांचा काळ फार नाजूक असतो.
बी : एकंदर जमिनीनुसार पाण्याच्या ८ ते १० पाळ्या लागू शकतात.
उन्हाळी : जमिनीच्या मगदुराप्रमाणे यथायोग्य अंतराने पाण्याच्या१५-१७ पाळ्या लागतात. पेरणीनंतर लगेच ओलित करावे. संपूर्ण उगवण झाल्यानंतर पीक फुलो-यात येईपर्यंत पाण्याचा ताण द्यावा.

रासायनिक खताची मात्रा, वेळ : साधारणपणे एकरी २ ते ३ बॅग सुपर फॉस्फेट पेरणीपूर्वी फेकावे व पेरणीसोबत एकरी एक बॅग डी.ए.पी. अर्धी बॅग पोटॅशसोबत ५ किलो झिंक सल्फेट व १ किलो बोरॅक्स अधिक १० किलो रायझर-जी वापरावे. ५०% फुलोरा अवस्थेत एकरी २०० किलो जिप्सम दिल्यास फायदा होतो.

किडी व रोगव्यवस्थापन : भुईमुगावर मुख्यतः पाने पोखरणारी/पाने गुंडाळणारी अळी, तुडतुडे व फुलकिड्यांचा प्रादुर्भाव आढळतो.

फुलकिडे : कोवळ्या शेंड्यात तसेच पानांवर आढळतात. पानांचा पृष्ठभाग ओरखडल्यामुळे पानावर वरच्या बाजूस पांढरे, पिवळसर फिक्कट चट्टे पडतात व खालचा भाग तपकिरी रंगाचा होऊन चमकतो.

तुडतुडे : पानांमधील रस शोषतात. त्यामुळे पाने पिवळी पडतात. तुडतुडा व फुलकीड दोन्हींच्या नियंत्रणसाठी डायमेथोयेट (रोगार) ३० मिली किंवा मिथाईल डेमेटॉन (मेटासिस्टॉक्स) किंवा प्रोफेक्स सुपर फवारावे.

पाने गुंडाळणारी किंवा पाने पोखरणारी अळी : ही अळी पाने पोखरते व गुंडाळते. नियंत्रणासाठी प्रोफेक्स सुपर/ क्लोरो सायपर/ट्रायझोडेल्टा यापैकी एक ४० मिली प्रतिपंप फवारावे.
भुईमुगावर मर, मूळकूज, खोडकूज, तांबेरा हे रोग आढळतात. तांबेरा हा टिक्का नियंत्रणासाठी डायथेन एम-४५ - ४० ग्रॅम प्रतिपंप व मर, मूळकूज, खोडकूज नियंत्रणासाठी मँकोझेब ५ ग्रॅम अधिक ट्रायकोडर्मा ६ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास चाळून बीजप्रक्रिया करावी.

कीटकनाशके बुरशीनाशक तणनाशके संजीवकांचे तांत्रिक व व्यापरी नावे व उपयोग

कीटकनाशके, बुरशीनाशक
तणनाशके, संजीवकांचे तांत्रिक व्यापरी नावे उपयोग

पुढील पानावरील तक्त्यामध्ये तणनाशके व त्यांच्या वापराबद्दल माहिती दिली आहे. निवडक तणनाशके त्या-त्या पिकांमध्ये दिलेल्या अवस्थेमध्ये व वेळेत फवारावीत. जरी तणनाशके निवडक असली तरी मुख्य पिकाला यांच्या वापराने थोडा शॉक लागतो व काही प्रमाणात पिकाची वाढ खुटते किंवा पिवळेपणा येतो. हे रोखण्यासाठी तणनाशकासोबत एकरी ५०० मि.ली. शॉक-अब वापरावे. तणनाशकांचा वापर काळजीपूर्वक समजून उम जून करावा.

     अनिवडक तणनाशके : जसे ग्लाईफोसेट, (ग्लाइसेल, राऊंडअप) पॅरॉक्वॉट डाइक्लोराईड 
(ग्रामोग्झोन, पॅरॉक्वॉट) यांचा वापर मुख्य पिकावर न पडता फक्त तणांवर फवारल्यास जसे फळबाग, उघडे शेत, मोठी पिके, तण नियंत्रण करता येते. ग्लाइफोसेर तणांना मुळापर्यंत मारते. मात्र, त्याला १५ दिवसांचा कालावधी लागतो. पॅरॉक्वॉट कोवळ्या तणांना मारते, काडी निबर झाल्यास मात्र तण परत हिरवे होऊ शकते. हे वापरताना काळजी घ्यावी.


सुधारित ऊस लागवड तंत्र


सुधारित ऊस लागवड तंत्र

एकरी १०० टन ऊस उत्पादनाचे उद्दिष्ट

 विदर्भ-मराठवाड्यामध्ये उसाची हेक्टरी उत्पादता कमी असण्याची कारणे :

१) आधुनिक ऊस लागवड तंत्रज्ञानाचा अभाव.
२) सेंद्रिय पदार्थांचा शेतात वापर कमी.
३) रासायनिक खतांचा असंतुलित व चुकीचा वापर.
४) अयोग्य बेण्याचा वापर.
५) दोन सरी व दोन रोपांतील कमी अंतर.
६) तणनाशकाचा योग्य वेळी वापराचा अभाव.
७) पाण्याचा ताण किंवा तुडुंब सन्या भरून पाणी.
८) चुकीच्या पद्धतीने व चूकीच्या वेळी आंतरमशागत.
९) जिवाणू खत वापराचा अभाव.
१०) अयोग्य वेळेत ऊस लागवड व ऊस तोडणी.

१)     उसाच्या प्रचलित जाती व त्यांचे वैशिष्ट्येलागवडीपूर्वी बेणेप्रक्रिया
चांगले उत्पादन घेण्यासाठी शुद्ध व आनुवंशिक गुणधर्म चांगले असलेलेच बेणे वापरावे व बेणेप्रक्रिया नक्की करावी. यामुळे ब-याच कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळता येतो.
प्रतिलिटर पाण्यामध्ये २ मिली बाव्हिस्टीन, २ ग्रॅम चुन्याची निवळी, ३ मिली रोगोबुष्ट किंवा रोगोर व ४ मिली रायझर या प्रमाणात मिसळून डोळे १० ते १५ मिनिटे पाण्यात बुडवून नंतरच लागवड करावी.

जमिनीची सुपीकता
फक्त रासायनिक खतांचा भरमसाट वापर करून कोणत्याही पिकाचे नेहमी विक्रमी उत्पादन घेणे शक्य नाही. उसाच्या उत्पादन सुपीकता वाढीसाठी खालीलपैकी शक्य तेवढे उपाय करावेत. शेणखताचा वापर/सेंद्रिय खतांचा वापर/गांडूळ खतांचा वापर/हिरवळीच्या खताचा वापर/प्रेसमेडचा वापर/निंबोळी/करंजी पेंडेचा वापर तसेच पिकाचा फेरपालट व आंतरपीकसुद्धा घ्यावे. यामुळे जमिनीतील जिवाणूंची संख्या वाढते व रासायनिक खतांची उपलब्धता वाढण्यास मदत होते. तसेच अॅझाटोबॅक्टर, पी.एस.बी., ट्रायकोडर्मा या जिवाणूंचासुद्धा वापर करावा. या जीवाणू खतांचे ड्रेचिंग करणे फारच फायद्याचे ठरते.

रोप लागवडीचे फायदे
          1.  बेणे, पाणी, वेळ व पैशांची बचत.
 • 2.  जमिनीचा अधिकाधिक कार्यक्षमतेने वापर होतो.
  3.  रोपांची संख्या १००% पर्यंत राखता येते.
  4.  गाळपयोग्य उसाची संख्या अधिक.
  5.  खोडवा चांगला येतो.
  6.  रोपे समान वयाची एकसमान वाढ.
  7.  पिकाची उत्तम वाढ व उत्पादनात वाढ.

लागवडीचे अंतर सरीची रुंदी
*नैसर्गिकरीत्या पक्व उसांची एकरी संख्या ३०,००० ते ४०,००० असते.
पारंपरिक तीन, सव्वातीन फुटांची सरी व तोंडाला तोंड लागवड पद्धतीमध्ये २५ ते ३० हजार डोळे लागतात. प्रत्येकी पाच फुटवे आल्यास दीड लाख फुटवे व त्यापेक्षा जास्त फुटवे आल्यास दोन लाखांपेक्षा जास्त फुटवे येतात. ही फुटवे पाणी, रासायनिक खते, सूर्यप्रकाश या सर्वच गोष्टी खातात व खाऊन चार-पाच महिन्यांनी दाटणी झाल्याने मरतात. म्हणून यांना खाऊन मरणारे फुटवे म्हणतात. त्यामुळे फुटव्यांची संख्या योग्यच असावी. त्यासाठी सरीची रुंदी व डोळ्यातील अंतर योग्य असावे. बैल मशागत असल्यास सरीची रुंदी ४ फूट ठेवावी किंवा ३ फुटात जोडओळसुद्धा योग्य. ट्रॅक्टरने मशागत करत असल्यास सरीची रुंदी ५ किंवा ६ फूट ठेवावी. दोन डोळे किंवा रोपांतील अंतर फुटव्यांची संख्या व जगणाच्या उसाचा तक्ता खाली दिलेला आहे.   

याप्रमाणे सरीची रुंदी ते फूट आपल्या सोईने ठेवून दोन डोळ्यांतील अंतर ते फूट ठेवावे त्याप्रमाणे फुटव्यांवर नियंत्रण ठेवून जगणारे ऊस योग्य राखावे. म्हणजे उत्पादनात मोठी वाढ होते.


लागवड पद्धत
कोरडी लागवड : मध्यम ते भारी जमिनीमध्ये उसाची कोरडी किंवा वापशावर लागवड. सरीमध्ये सेंद्रिय, रासायनिक खते, सूक्ष्म अन्नद्रव्ये सर्व टाकून कुदळीच्या किंवा बळीराम नांगराच्या साहाय्याने , इंच चळी घ्यावी. म्हणजे खते मातीत मिसळतील डोळा लावण्यास चळी तयार होईल. चळीमध्ये - इंच खोलीवर योग्य अंतरावर टिपया लावून मातीने झाकून घ्याव्यात. - वेळेस पाणी हलके द्यावे. फायदे - बेणे योग्य अंतरावर लावता येते. १५ ते २० दिवसांत उगवण पूर्ण होते. जोमदार कोंब येतो, ८५% पेक्षा जास्त उगवण होते, उत्पादन वाढते.

ओली लागवड
हलक्या जमिनीत ओली लागवड करावी. भारी जमिनीत ओली लागवड केल्यास उशिरा उगवण, असमान उगवण, योग्य अंतर राखू शकत नाही. कमी उसाची संख्या कमी उत्पादन,

तीन डोळा टिपरी : एकरी ते टन बेणे लागते. ऊसाची योग्य संख्या राखता येत नाही. खाऊन मरणारे फुटवे जास्त असतात. ऊस जाडीस लहान राहतो. ही पद्धत शेतक-यांनी ताबडतोब बंद करावी.

दोन डोळा टिपरी : टिपरी तयार करताना डोळ्याच्या वरचा भाग कमी खालचा भाग जास्त ठेवावा. दोन डोळ्यांमध्ये योग्य अंतर ठेवून डोळे बाजूला येतील, अशी लागण करावी. कमी फुटवे येणा-या जातीमध्ये दोन टिपरीत अंतर कमी ठेवावे.

एक डोळा टिपरी : डोळ्याचा वरचा भाग कमी खालचा जास्त ठेवावा. तीन डोळा टिपरीपेक्षा ६६% बेणे कमी लागते. उगवण लवकर होते. डोळा वर ठेवून लागण करावी खाडे पडू नये यासाठी रोपाची लागवड सोबत करावी. खाडे पडल्यास त्याठिकाणी रोपे लावावीत.

रासायनिक खताच्या मात्रा
एक टन ऊस पिकवण्यासाठी एन पी के किती लागतो याची माहिती शास्त्रज्ञांनी सिद्ध केली आहे. त्यानुसार खतांच्या मात्रा ठरवाव्यात ते वेळा विभागून घ्याव्यात. साधारणतः मध्यम एन पि के असलेल्या जमिनीमध्ये १०० टन उत्पादन घेण्यासाठी आवश्यक खते त्यांची वेळ खालीलप्रमाणेएकरी १०० टन उत्पादन उद्दिष्ट ठेवल्यास रासायनिक खतांचा एकरी अपेक्षित खर्च (रु.१९,०००). एकरी लागणारे एकूण खत - युरिया बॅग, डीएपी-, पोटॅश , अमोनियम सल्फेट-, सल्फर-३० किलो, मॅगसल्फेट-३० किलो, रायझर-जी-३० किलो.

) लागवडीपूर्वी सरीत पसरवणे - डीएपी पोटॅश- प्रत्येकी - बॅग,सल्फर दाणेदार, मॅगनेशियम सल्फेट, रायझर-जी प्रत्येकी १० किलो.
) लागवडीनंतर २० दिवसांनी - एक बॅग युरिया.
) लागवडीनंतर ४० दिवसांनी - एक बॅग युरिया.
) ६५ दिवसांनी किंवा बाळबांधणीला - युरिया, डीएपी पोटॅश प्रत्येकी  बॅग, सल्फर दाणेदार, रायझर-जी, मॅग्नेशिअम सल्फेट प्रत्येकी १० किलो मिसळून पहारीने छिद्रे करून एक-एक फुटावर टाकावे.
) मोठी बांधणी - युरिया - बॅग + डीएपी- बॅग + पोटॅश- बॅगसल्फर, मॅगसल्फेट, रायझर-जी प्रत्येकी १० किलो
) मोठ्या बांधणीनंतर एक महिन्याने - अमोनियम सल्फेट, डीएपी व पोटॅश प्रत्येकी बॅग
) मृग नक्षत्र निघाल्यानंतर - अमो. सल्फेट - बॅग, पोटॅश - २५ किलो 
लागवडीनंतर मोठ्या बांधणीनंतर १० दिवसांनी जिवाणू द्यावेत.
अझाटोबॅक्टर, पी.एस.बी., ट्रायकोडर्मा प्रत्येकी लिटर किंवा किलो
सूक्ष्म अन्नद्रव्ये, मॅग्नेशिअम सल्फेट आदी शेणखतात मिसळून -७ दिवसांनी शेतामध्ये द्यावीत.

पाण्याचे नियोजन : पाणी हे मुळांच्या परिघात द्यावे. भारी जमिनीमध्ये जास्त पाणी एकाच वेळेस दिल्यास निचरा कमी होतो मुळांची कार्यक्षमता कमी होते. सया भरून तुडुंब पाणी देता मापक मुरेल तेवढे पाणी द्यावे. थोडे थोडे पण सारखे सारखे पाणी द्यावे. एप्रिल-मेमध्ये ताण पडू देऊ नये.

तणनाशकांचा वापर
'तण खाई धन' या उक्तीनुसार ऊस लागवडीनंतर पहिल्या चार महिन्यांत तणांचा बंदोबस्त केल्यास ५०% पर्यंत उत्पादन घटू शकते. सध्या उपलब्ध तणनाशकांमध्ये मेट्रिब्युझीन (सेन्कॉर) हे तणनाशक फायद्याचे उत्कृष्ट आहे. लागवड झाल्यानंतर ते दिवसांनी जमिनीत ओलावा असताना पहिला व दोन महिन्यांनी दुसरा फवारा एकरी ४०० ग्रॅम या प्रमाणात दिल्यास निंदण करण्याची फारशी आवश्यकता पडत नाही.

फवारणी व्यवस्थापन
संजीवकांचा योग्य वेळी योग्य प्रमाणात वापर केल्यास उत्पादनामध्ये भरीव वाढ होते व यांच्या सोबत आपण आवश्यक कीटकनाशके, बुरशीनाशके व विद्राव्य खतांचा वापरसुद्धा करू शकतो. ज्यामुळे कीड, रोग नियंत्रण वेळेवर होते. आपले उत्पादनाचे उद्दिष्ट गाठण्यासाठी खालील फवारण्या कराव्यात. सर्व फवारण्यांचे एकरी प्रमाण दिले आहे. त्यानुसार पंपाचे प्रमाण वापरावे. उत्पादन वाढीसाठी फवारण्या महत्त्वाच्या आहेत.

पहिली फवारणी
लागवडीपासून ४५ दिवसांनी, खोडव्यास ३० दिवसांनी (एकरी ४ पंप) १९:१९:१९ - ६०० + परिस स्पर्श - १२० + क्लोरोपायरिफॉस-२५० + बाव्हिस्टीन - १२० + आयबीए - १ ग्रॅम + ६ बीए - ४ ग्रॅम

दुसरी फवारणी
लागवडीपासून ६५ दिवसांनी खोडव्यास ५० दिवसांनी (एकरी ६ पंप) - १२:६१:०० - ९०० + रिफ्रेश - २५० + कॅल्शियम - २५० + सरेंडर किंवा प्रोफेक्ससुपर - २५० + बाव्हिस्टीन - २०० + जीए - ४ ग्रॅम + ६ बीए - ४ ग्रॅम

तिसरी फवारणी
८५ दिवसांनी व खोडव्यास ७० दिवसांनी (एकरी ९पंप)१२:६१:०० - १३०० + रिफ्रेश - ४०० + बिग-बी - १ किलो + मोनोक्रोटोफॉस - २७० + सुखई - २७० + जीए - ६ ग्रॅम + ६ बीए - ६ ग्रॅम

चौथी फवारणी
लागवडीपासून १०५ व खोडवा ९० दिवसांनी (एकरी १० पंप)
१३:००:४५ - १ किलो, बिग-बी - ५०० ग्रॅम + कॅल्शियम - ४०० ग्रॅम + रिफ्रेश - ४०० मिली + ट्रायझोफॉस डेल्टामेथ्रीन - ४०० + बाव्हिस्टीन - ४०० + जीए - ७ ग्रॅम + ६ बीए - ७ ग्रॅम ।

खोडवा व्यवस्थापन
आपल्याकडे खोडवा पिकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे खोडव्याचे उत्पादन कमी येते. उसाचा खोडवा ठेवून उत्पादन खर्चात ३५ ते ४० टक्के बचत करता येते व लागवडीच्या उसाएवढे उत्पादन खोडव्यामध्ये घेता येते.

खोडवा का ठेवावा : पूर्वमशागतीवरील वेळ, श्रम व खर्च वाचतो. बेणे व बेणेप्रक्रिया यांचा खर्च वाचतो. पहिल्या उसाची मुळे तयार असल्याने फुटवे एकाचवेळी झपाट्याने येतात. लागणीच्या उसापेक्षा १ ते दीड महिना लवकर पक्वता. पाचटाच्या आच्छादनामुळे तण व आंतरमशागतीवरील खर्च कमी. लागवडीच्या उस पेक्षा ताण जास्त सहन करतो.

खोडव्याचे उत्पादन कमी का येते?
लागण उसापेक्षा दुर्लक्ष. लागण उसाची उगवण विरळ असेल तर उसाची संख्या कमी होऊन उत्पादन घटते. लागण उसात योग्य पाणी, खत, मशागत नसल्यास खोडवा उत्कृष्ट येत नाही. शिफारशीत खते सूक्ष्मअन्नद्रवे व फवारणीचा अभाव. लागण उसाची तोड जमिनीलगत न केल्यास उत्पादनात घट, फेब्रुवारीनंतर लागण उसाची तोडणी झाल्यास कीड रोगामुळे खोडव्याचे उत्पादन घटते.

खोडवाव्यवस्थापनाचे सुधारित तंत्र :
पाचट चुकूनही जाळू नका. पाचट ठेवल्यास जमिनीची सुपीकता वाढते. क्षारांचे प्रमाण घटते. जमिनीत हवा खेळती राहते. बाष्पीभवनाचा वेग कमी (म्हणजे पाण्याची गरज कमी). जमीन वापश्यावर राहते. जमिनीत तापमान योग्य राहल्यामुळे जिवाणूंची संख्या वाढते. खुरपणी, मजुरीची बचत.
वरंब्यावरील पाचट सरीमध्ये घ्यावे, जमिनीलगत बुडखा छाटणी करावी, पाचट लवकर कुजण्यासाठी एकरी १ बॅग युरिया व एक बॅग सुपर फॉस्फेट व शक्य असल्यास रोटव्हिटर पाचटामध्ये चालवून बारीक करून मातीत मिसळावे.
बुडखा छाटल्यावर वापसा असताना किंवा जमीन कडक असल्यास पाणी देऊन वरंब्याच्या बगला बळीराम नांगराने फोडून घ्याव्यात. खाडे/ नांग्या असल्यास ऊस तोडणीपूर्वी एक महिना आधीच एक डोळा पद्धतीने रोपे तयार करावीत व तुटून गेल्यानंतर ती १५ दिवसांनी लावावीत. 

मशागतीशिवाय खोडवाव्यवस्थापन
नवीन संशोधनानुसार कोणत्याही मशागतीशिवाय खोडवा पिकाचे किफायतशीर उत्पादन घेणे शक्य आहे, या पद्धतीत ऊस तुटून गेल्यावर बुडख्यावरील पाचट बाजूला सारून आहे तसेच पडू द्यावे. जमिनीवरील बुडखे छाटावीत, एकरी १ बॅग युरिया व सुपर फॉस्फेपेट प्रत्येकी देऊन १५ दिवसांच्या आत शिफारशीत खते देऊन पाणी द्यावे. या पद्धतीत बगला फोडणे, मोठी बांधणी, बाळ बांधणी, आंतरमशागत काहीही करू नये. कोणत्याही मशागतीशिवाय सलग पाचट आच्छादन व पहारीने भोके पाडून मुळांच्या सान्निध्यात खते दिल्यास उत्पादन घट न येता कमीत कमी खर्चातखोडवा पीक घेता येते. पाचट उशिरा कुजल्याने खूप कमी पाणी लागते, तण होतच नाही, आच्छादनामुळे खूप जिवाणू वाढतात व पाचट उशिरा कुजल्याने उलट फायदे होतात व मशागतीचा पूर्ण खर्च वाचतो.

खोडवा खतव्यवस्थापन
खोडवा पिकास सर्व खतांची गरज लागवडीच्या उसाएवढीच असते.पहिली मात्रा तोडणीनंतर १० दिवसांमध्ये. एकरी १०० टन उद्दिष्ट ठेवल्यास साधारपणे खालील शिफारशीत खते खोडव्याला द्यावेत.
ü  पहिली मात्रा : पहारीने बेटापासून १ फुटावर ओरंब्याच्या बगाला ४ ६ इंचाचे खोल छिद्र करूनच द्यावी. युरिया, डीएपी व पोटॅश एकरी ७५ किलो + रायझर-जी १५ किलो + सल्फर दाणेदार १५ किलो + माती मिसळून मॅग्नेशियम सल्फेट १५ किलो.
ü  दुसरी मात्रा : ३० दिवसांनी युरिया १०० किलो + लिंबोळी पेंड २० किलो.
ü  तिसरी मात्रा : ६० दिवसांनी पहिल्या मात्रेप्रमाणे पहारीने छिद्र करून द्यावी.
ü  चौथी मात्रा : ९० दिवसांनी युरिया ५० किलो.
ü  पाचवी मात्रा : १२० दिवसांनी युरिया ५० किलो.
ü  सहावी मात्रा : १५० दिवसांनी अमोनियम सल्फेट ५० किलो वपोटॅश ५० किलो.
जिवाणू अझाटोबॅक्टर, पीएसबी, ट्रायकोडर्मा प्रत्येकी २ किलो किंवा १ लिटर प्रत्येकी खताची पहिली व तिसरी मात्रा दिल्यानंतर १० दिवसांनी द्यावी.

बाळबांधणी व मोठी बांधणी
बाळ बांधणी
लागवडीनंतर दीड ते दोन महिन्यांनी बाळबांधणी करावी. फुटव्याला ३ ते ४ इंच माती लावावी. त्यामुळे फुटवे जोमाने वाढतात. रासायनिक खते मातीआड दबतात. खोडकिडीचे काही प्रमाणात नियंत्रण होते. मोठ्या बांधणीपर्यंत दातेरी कोळपे, डवरे चालवून जमीन भुसभुशीत ठेवावी. सरी बुजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

मोठी बांधणी
लागवडीनंतर ३.५ ते ४ महिन्यांनी खताचा हप्ता देऊन वरंबे फोडून घ्यावे. नंतर माती चांगली मोकळी करून रिजरच्या साहाय्याने मोठी बांधणी करावी. यामध्ये वरंब्याची सरी व सरीचा वरंबा होतो. ज्यामुळे ऊस लोळत नाही. पाणी व्यवस्थित देता येते. जास्त फुटव्यांची संख्या दाबता येते. हवा खेळती राहते.