Search This Blog

विद्राव्य खतांचा योग्य वापर


विद्राव्य खतांचा योग्य वापर


अन्नद्रव्ये झाडाच्या कोणत्याही भागासाठी लागत असली किंवा कोणत्याही भागावर परिणामकारक असली तरी ती जमिनीतून मिळविण्याची झाडांची नैसर्गिक पद्धत आहे. जमिनीतून रासायनिक खते देणे ही जुनी पद्धत आहे. याचे कारण ते स्वतः उपयोगाच्या दृष्टीने सोईस्कर व त्यांचा नंतर पिकास दीर्घकालीन होणारा फायदा. तसेच मोठ्या प्रमाणात एकाच वेळी खते देऊ शकतो. यामुळे मुख्यत्वे मुख्य व दुय्यम अन्नद्रव्ये हे जमिनीतूनच देणे सोईचे. मात्र, विपरीत परिस्थितीमध्ये हे आपण फवारणीतून पानांद्वारेसुद्धा देऊ शकतो.
पानांद्वारे फवारणीमधून दिल्या जाणा-या मात्रेला बंधने आहेत. ज्या प्रमाणात जमिनीमधून देऊ शकतो तेवढ्या मोठ्या प्रमाणात फवारणीतून विद्राव्य खते देणे शक्य नसते. पानांद्वारे दिलेली सर्व अन्नद्रव्ये, घटक पिकाला ताबडतोब उपलब्ध होतात व त्यांचा त्याला थोड्या काळासाठी फायदा होतो. ते दीर्घकाळ फायदा देऊ शकत नाहीत; परंतु रासायनिक खतांच्या भाववाढीमुळे आपण यांचा अचूक वापर केल्यास निश्चित फायदा होतो.
विद्राव्य खतांमध्ये जास्तीत जास्त शेतक-यांना फक्त १९:१९:१९ हाच ग्रेड माहीत आहे व बरेच शेतकरी बहुतांश फवारणीत याचाच वापर करतात. मात्र, पिकांच्या वेगवेगळ्या अवस्थांनुसार वेगवेगळे ग्रेड तयारआहेत. त्या त्या अवस्थेमध्ये ते ग्रेड फवारल्यास सर्वच पिकांमध्ये खतांवरील खर्च कमी होऊन उत्पादकता निश्चित वाढेल. एकच एक विद्राव्य खताची फवारणी न करता पिकाच्या अवस्थेनुसार विद्राव्य खताचा ग्रेड निवडावा.
तसेच विद्राव्य खतांची फवारणी खालील परिस्थितीमध्ये आवश्यक करावी जसे
* पिकाला जास्त दिवसांपासून जमिनीतून खत देणे शक्य न झाल्यास.
* खताच्या डोजला उशीर होत असल्यास.
* जास्त पाण्यामुळे किंवा पाण्याच्या ताणामुळे पिकांना जमिनीमधूनअन्नद्रव्य मिळेनाशी झाल्यास.
* भरपूर पाते-फुले आहेत व त्या प्रमाणात खतांचा पुरवठा नसल्यास.
* कापसाच्या उत्तरार्धात भरपूर बोंडे आहेत व लाल पाने होण्यास सुरुवातझाल्यास.

सर्वच पिकांच्या अवस्थेनुसार शिफारशीत विद्राव्य खतांचे ग्रेड

  • वाढीची अवस्था व विपरीत परिस्थितीमध्ये अन्नद्रव्ये उपलब्ध होतनसल्यास - परिस १९:१९:१९ किंवा २०:२०:२० किंवा युरिया
  • वाढ व फुलोरा सुरुवात - परिस १२:६१:०० किंवा डी.ए.पी.
  • भरपूर फुलोरा व फळधारणा - परिस ०:५२:३४/परिस १३:४०:१३
  • फळधारणा व फळांची वाढ - परिस १३:००:४५ किंवा बिग बी
* प्रमाण ७ ग्रॅम प्रतिलिटर पाणी
* चांगल्या गुणवत्तेचीच विद्राव्य खते वापरावीत.
कापूस, सोयाबीन, हरभरा, तूर इत्यादी पिकांमध्ये कमी खर्चामध्ये विद्राव्य खतांचे व्यवस्थापन करायचे असल्यास खालीलप्रमाणे वापर करावा.
१) लागवडीनंतर ४०-५० दिवसांनी - परिस १९:१९:१९ किंवा युरिया+ मॅग्नेशियम सल्फेट
२) लागवडीनंतर ५५-६० दिवसांनी - परिस १२:६१:०० किंवा डी.ए.पी.
३) लागवडीनंतर ७०-७५ दिवसांनी - परिस ०:५२:३४ किंवा डी.ए.पी.
४) लागवडीनंतर ८५-९० दिवसांनी - युरिया + बिग बी
आवश्यकता असल्यास शेवटचा फवारा १० दिवसांनी परत घ्यावा.युरियाचे प्रमाण १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी याप्रमाणे घ्यावे. डी.ए.पी.सुद्धा १० ते १२ ग्रॅम प्रतिलिटर याप्रमाणे घ्यावे. डी.ए.पी. पाण्यात विरघळत नसल्याने आपल्याला फवारणीसाठी किती पाणी लागते त्या हिशोबाने डी.ए.पी.चे प्रमाण ठरवून ते रात्री थोड्या पाण्यात टाकून ठेवावे व सकाळी हे पाणी फडक्याने गाळून घेऊन मग वापरावे. सरळ डी.ए.पी. न वापरता त्याची निवळी वापरावी. बिग बीचे प्रमाण ७ ते १० ग्रॅम प्रतिलिटर पाणी या प्रमाणात वापरावे.
विद्राव्य खते किंवा डी.ए.पी., युरिया मॅग्नेशियम सल्फेट, बिग बी फवारताना ती कीटकनाशके, बुरशीनाशके, संजीवके यामध्ये मिसळतात किंवा नाही हे तपासून पाहावे. द्रावण घट्ट झाल्यास किंवा फाटल्यास किंवा चांगले एकत्र न झाल्यास याची वेगळी फवारणी करावी. निकृष्ट दर्जाचे विद्राव्य खत असल्यास काही कीटकनाशकांचे पाहिजे तेवढे चांगले परिणाम दिसत नाहीत. म्हणून चांगल्या गुणवत्तेचीच खते वापरावी.

No comments:

Post a Comment