जिवाणू खतांची कार्ये वापर, फायदे व शिफारस
फार काही जुनी गोष्ट
नाही. आपले आजोबा, वडील सांगत होते, शेणखताने पीक चांगले येते. पिकावर कीड व
रोगसुद्धा कमी येतात; पण काळ बदलला. गुराढोरांची संख्या कमी होऊ लागली तसा
शेणखताचा वापरसुद्धा कमी व्हायला सुरुवात झाली आणि वडीलधा-यांनी सांगितलेल्या
गोष्टीला दुजोरा मिळाला. खर्च वाढवूनही उत्पादनात मात्र वाढ होईनाशी झाली. असे का
बरे व्हावे ! असे काय असेल या शेणखतात
याचे उत्तर शोधायचा
प्रयत्न मात्र शेतक-यांनी केला नाही, हे लक्षात येते. शेणखत असो, कंपोस्ट खत असो,
यामध्ये पिकाला लागणा-या १६१७ अन्नद्रव्यांसोबतच अन्नद्रव्ये उपलब्ध करून देणारे
रोगप्रतिकारकशक्ती वाढविणारे अर्थातच जमिनीची उपजाऊ शक्ती वाढविणारे जिवाणू असतात.
परंतु पिकाला आवश्यक
असणा-या अन्नद्रव्यांची मात्रा आपल्याकडे उपलब्ध असलेल्या शेणखतामधून आपण पूर्ण
करू शकत नाही; परंतु याला पर्याय तर शोधावाच लागेल. याला पर्याय म्हणजे बाजारात
उपलब्ध असलेल्या जिवाणू खताचा योग्य प्रकारे वापर ! मग ही जिवाणू खते आहेत तरी
काय?
निर्सगाच्या शक्तीला कमी
लेखू नका ! निसर्गाने सर्व अडचणींवर उपाययोजना करून ठेवलेलीच आहे. त्याच आधारे
बी.टी. तंत्रज्ञानाने नैसर्गिकरीत्या अळीवर नियंत्रण मिळविले गेले. परिणामी,
कीटकनाशकाचाएकरी हजारो रुपयांचा खर्च वाचवून आपले होणारे नुकसान तर टळलेच. शिवाय
उत्पादनात मोठ्या प्रमाणात भर पडली. हा झाला कीटकनाशकाचा भाग !
यासोबतच आपल्या शेती
व्यवसायात रासायनिक खतांचा वापरगैरवापर, नुकसान-फायदे, वारेमाप वाढलेल्या किमती हा
एक ज्वलंत प्रश्न निर्माण झाला; परंतु वर सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अडचणीवर
निसर्गाने निसर्गतःच उपाययोजना करून ठेवल्यात. गरज आहे त्या शोधण्याची,
आत्मसात करण्याची !
रासायनिक खतांचा वापर आपणास कमी करता येईल. आपल्या शेती व्यवसायात उत्पादनाच्या
२५% खर्च रासायनिक खतावर होत असावा. गैरवापर, अतिरेकी वापर यामुळे आपला उत्पादन
खर्च तर वाढतो आहेच. शिवाय जमिनीचा कस दिवसेंदिवस खालावत आहे. अशातच वारेमाप
वाढलेल्या खतांच्या किमती त्यातही तुटवड्यासोबत लिंकिंगसारख्या बाबी ज्यामुळे यावर
उपाययोजना शोधणे आज काळाची गरज झाली आहे.
शेती व्यवसायात काही महत्त्वाच्या जिवाणूंची
माहिती देत आहोत.
१) अॅझोटोबॅक्टर, रायझोबिएम हे नत्र पुरविणारे जिवाणू योग्य प्रमाणात वापरल्यास नत्राची चांगल्या
प्रकारे उपलब्धता होऊन रासायनिक स्वरूपाच्या नत्रावर होणा-या खर्चावर ब-याच अंशी
बचत करता येते.
२) पी.एस.बी. (फॉस्फेट सोल्युबलायझिंग बॅक्टेरिया) - स्फुरद उपलब्ध करणारा जिवाणू, स्फुरद हा पिकाला
लागणारा महत्त्वाचा घटक, मुळे, फांद्या, फुले, फळे यांच्या विकासात स्फुरदाचा
महत्त्वाचा भागअसतो.
रासायनिक खतांच्या
माध्यमातून आपण स्फुरदाच्या मात्रेची पूर्तता वेळोवेळी करतो; परंतु जमिनीमध्ये
स्फुरद विरघळविणा-या जिवाणूंची संख्या दिवसेंदिवस कमी होत चालली. परिणामी
स्फुरदाची मात्रा आपण १ (एक) पोत्यावरून ३-४ पोत्यांपर्यंत देऊ लागलो; परंतु
पी.एस.बी. जिवाणूंची संख्या कमी झाल्यामुळे वाढविलेल्या खतांचा अपेक्षित परिणाम
उत्पादन वाढीमध्ये झालेला दिसत नाही. याचाच अर्थ जमिनीचा जिवंतपणा कायम
ठेवण्याकरिता जमिनीमध्ये जिवाणूंची अपेक्षित संख्या आवश्यक आहे.
पी.एस.बी. जिवाणूंचा वापर
जमिनीमधून स्फुरदच्या मात्रेत साधारणपणे ३०% पर्यंत कपात करता येते. पी.एस.बी.च्या
वापराने जमिनीत असलेले स्फुरद तर उपलब्ध होतेच शिवाय पी.एस.बी.चा जिवाणू
जमिनीमध्ये इंडॉल अॅसिटिक अॅसिड, जिब्रेलीन व काही अॅन्टिबॉडीज सोडत असल्याकारणाने
मुळांची व पिकाची जोमाने वाढ होते. स्फुरदाची उपलब्धता वाढल्याने सोबत कॅल्शिअम,
जस्त व लोह यांचीदेखील उपलब्धता कमालीच्या प्रमाणात वाढते. सर्वच पीकांमध्ये
पी.एस.बी. वापरावे.
३) पी.एम.बी. (पोटॅश मोबिलाइझिंग बॅक्टेरिया) - आपल्या जमिनीमध्ये पोटॅशची मात्रा भरपूर आहे,
असे कित्येक वर्षांपासून आपण ऐकत आलो; परंतु असे असूनही पोटॅशवरील खर्च दिवसेंदिवस
वाढत चालला आहे. जमिनीत असलेल्या पोटॅशपैकी बराच पोटॅश सिलिकेट मिनरलच्या स्वरूपात
असतो. सिलिकेट मिनरलला ऑरगॅनिक अॅसिडद्वारे विघटन करून पिकास उपलब्ध करून देता
येते. त्याकरिता पोटॅशच्या जिवाणूंचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पोटॅश खर्चावर
ब-याच अंशी कपात येते व जमिनीची सुपीकतादेखील वाढते. पी.एम.बी. सुद्धा सर्वच
पीकांमध्ये वापरावे.
मुख्य अन्नद्रव्ये
(एन.पी.के.)चा पुरवठा करणा-या जिवाणूंव्यतिरिक्त आणखी काही महत्त्वाच्या जिवाणूंची
संक्षिप्त माहिती खाली देत आहोत.
४) सुडोमोनास - हा बॅक्टेरिया शेती व्यवसायात निसर्गाने दिलेले वरदान म्हणावे
लागेल. हा बॅक्टेरिया, बुरशीजन्य सर्व प्रकारचे रोग तसेच जिवाणूजन्य रोग,
विषाणूजन्य रोग इत्यादींवर प्रभावीपणे कार्य करतो. या बॅक्टेरियाद्वारे अनेक
रोगांवर नियंत्रण तर मिळविले जाते. शिवाय या बॅक्टेरियाला प्लॅन्ट ग्रोथ प्रमोटिंग
बॅक्टेरिया म्हणूनसुद्धा उपयोगात आणतात. याची उपयोगिता प्रत्येक शेतक-याने जाणून
घेणे गरजेचे वाटते.
५) बिव्हेरिया बॅसियाना -
हा जिवाणू विविध अळ्या, रसशोषक किडी, पांढरी माशी, मिलीबगसुद्धा प्रभावीपणे नियंत्रणात
आणतो.
६) व्हटिसिलिएम लिकेणी - विविध किडींवर नियंत्रण ठेवणारा जिवाणू म्हणून
प्रचलित.
७) मेटॅरायझिएम - जमिनीत
उधळी, ह्युमनीसारख्या किडीवर उत्कृष्ट नियंत्रण,
८) ट्रायकोडर्मा - तूर,
हरभरा, भुईमुग यांचा मररोग सर्व प्रकारचे मुळकूज व सर्वच पिकांमध्ये विविध
प्रकारच्या बुरशीजन्य रोगांवर कार्य करते, योग्य पद्धतीने वापर केल्यास रासायनिक
बुरशीनाशकापेक्षा फायदेशीर. शेणखत कंपोस्ट खत कुजवण्यास उपयुक्त.
जिवाणू खते/संवर्धके
वापरताना घ्यावयाची काळजी
·
शक्यतोवर (फ्रेश)
उत्पादन, तारीख जवळचीच असलेले. अंतिमतारखेच्या बरेच आधीचे जिवाणू पाकिटे वापरावीत.
·
यांची साठवण दुकानामध्ये
किंवा घरी थंड ठिकाणी रसायनांपासून दूर कोरड्या ठिकाणी केलेली असावी.
·
जिवाणू खते बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया झाल्यानंतर वापरावीत.
·
रासायनिक खतांसबोत जिवाणूसंवर्धक मिसळू नये
·
विद्यापीठ किंवा खात्रीच्या कंपनीचेच व खात्रीच्या विक्रेत्यांकडून
जिवाणू खते घ्यावीत. जिवाणू खते उत्पादन करणाच्या काही नामांकित कंपन्या Booster,
I.P.L., Microbax, Margo, IPM
जिवाणू खतांची
बीजप्रक्रिया कशी करावी
जिवाणू खते पावडर व लिक्विड स्वरूपात उपलब्ध आहेत. साधारणतः
बीजप्रक्रिया किंवा ड्रेचिंग (बुडाशी टाकणे) या दोन पद्धतीने याचा वापर करतात.
बीजप्रक्रियेसाठी पावडर स्वरूपातील २५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास व द्रवरूप १० ते
२० मिली प्रतिकिलोस लावतात.
प्रत्येक तेलबिया व द्विदल धान्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे रायझोबियम
वापरावे व सर्वांसाठी पी.एस.बी.सुद्धा वापरावे. बुरशीजन्य रोगांच्या नियंत्रणासाठी
ट्रायकोडर्मा वापरावे. म्हणजे १ किलो सोयाबीन किंवा तूर किंवा हरभरा किंवा इतर
बियाण्यासाठी
ट्रायकोडर्मा
५ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे - बुरशीजन्य रोग
रायझोबियम २५ ग्रॅम किंवा १० ते २० मिली प्रतिकिलोस
पी.एस.बी. २५ ग्रॅम किंवा १० ते २० मिली प्रतिकिलोस
वापरण्यास हरकत नाही. वरील जिवाणू एका घमेल्यात घेऊन त्यात
आवश्यकतेप्रमाणे पाणी टाकून सोबत चिकटपणासाठी गूळ किंवा डिंक टाकावा व हे मिश्रण
बियाण्यावर शिंपडून सर्व बियांना लागेल असे सावकाश चोळून बियाणे सावलीत २, ३ तास
सुकवून पेरणी करावी.काही कारणास्तव जिवाणू खतांची बीजप्रक्रिया न केल्यास १ किलो
रायझोबियम, १ किलो पी.एस.बी. व १ किलो ट्रायकोडर्मा चांगल्या कुजलेल्या
शेणखतामध्ये मिसळून द्यावे. त्यावर पाणी टाकून काही दिवस गोणपाटाने झाकावे व
पहिल्या डवरणीच्या आधी शेतात सारखे पसरून द्यावे. जास्त एकरामध्ये करण्यासाठी
सर्वांचेच प्रमाण जास्त घ्यावे.
कापसासाठी बीजप्रक्रिया न करता जिवाणूंचे ड्रेचिंग करावे किंवा
ठिबकद्वारे जिवाणू सोडावेत. त्यासाठी साधारणतः
अॅझाटोबॅक्टर - १ किलो किंवा २५० मिली+पी.एस.बी.-१ किलो किंवा २५०
मिली
ट्रायकोडर्मा - १/२ किलो किंवा २५० मिली
हे प्रमाण एक एकर कापसासाठी
वापरावे. डॅचिंगसाठी किमान १० पंप वापरल्यास प्रतिपंप १०० ग्रॅम किंवा २५ मिली
जिवाणू खते वापरावीत. जमिनीमध्ये ओलावा असताना व लागवड झाल्यानंतर शक्य तेवढ्या
लवकर या जिवाणूंचा वापर केल्यास रासायनिक खतांमध्ये ब-याच प्रमाणात बचत होऊ शकते.
फळझाडे व इतर सर्वच पिकांमध्ये
जिवाणू खतांचा वापर फायद्याचा आहे. आतापर्यंत शेतक-यांनी याकडे लक्ष दिले नाही
याची अनेक कारणे आहेत. जशी रासायनिक खतांच्या कमी किमतीमध्ये उपलब्धता, निकृष्ट
दर्जाची जिवाणू खते. वापराबद्दल शास्त्रीय माहितीचा अभाव, विश्वासपात्र उत्पादने.
मात्र, आता जिवाणू खतांचा वापर ही काळाची गरज झाली आहे. याचा योग्य वापर करून आपला
फायदा करून घ्यावा.
No comments:
Post a Comment