कीटकनाशके, बुरशीनाशक
तणनाशके, संजीवकांचे तांत्रिक व व्यापरी नावे व उपयोग
पुढील पानावरील तक्त्यामध्ये तणनाशके व त्यांच्या वापराबद्दल माहिती दिली
आहे. निवडक तणनाशके त्या-त्या पिकांमध्ये दिलेल्या अवस्थेमध्ये व वेळेत फवारावीत.
जरी तणनाशके निवडक असली तरी मुख्य पिकाला यांच्या वापराने थोडा शॉक लागतो व काही
प्रमाणात पिकाची वाढ खुटते किंवा पिवळेपणा येतो. हे रोखण्यासाठी तणनाशकासोबत एकरी
५०० मि.ली. शॉक-अब वापरावे. तणनाशकांचा वापर काळजीपूर्वक समजून उम जून करावा.
अनिवडक तणनाशके : जसे
ग्लाईफोसेट, (ग्लाइसेल, राऊंडअप) पॅरॉक्वॉट डाइक्लोराईड
(ग्रामोग्झोन, पॅरॉक्वॉट) यांचा
वापर मुख्य पिकावर न पडता फक्त तणांवर फवारल्यास जसे फळबाग, उघडे शेत, मोठी पिके, तण
नियंत्रण करता येते. ग्लाइफोसेर तणांना मुळापर्यंत मारते. मात्र, त्याला १५ दिवसांचा
कालावधी लागतो. पॅरॉक्वॉट कोवळ्या तणांना मारते, काडी निबर झाल्यास मात्र तण परत हिरवे
होऊ शकते. हे वापरताना काळजी घ्यावी.
No comments:
Post a Comment