उडीद मूग व्यवस्थापन
उडीद व मूग या कडधान्याचे
मागील काही वर्षांतील बाजारभाव पाहता व याचा भविष्याचा विचार करता ही पिके
फायद्याची ठरू शकतात. लवकर येतात, उत्पादन खर्च कमी, रबी पिकासाठी शेत लवकर खाली.
या फायद्यांसोबतच काही अडचणीसुद्धा आहेत. त्या म्हणजे पेरणीस जास्त उशीर झाल्यास उत्पादनात
मोठी घट येते. काढणीच्या वेळेस पाऊस असेल किंवा मजूर न मिळाल्यास तोंडी आलेला घास
जाऊ शकतो. यलो मोझेंकने मोठे नुकसान होऊ शकते; परंतु काही क्षेत्रांत याचा प्रयोग
करण्यास हरकत नाही किंवा यांचे क्षेत्र असावे ज्यामुळे जोखीम कमी होते.
वाणाची निवड : टी.ए.आर.एम.- ०२, ९८ कोपरगाव मूग व उडदामध्ये टीएयु-१, टीएयू-२,
पी.के.व्ही.-१५ किंवा खाजगी कंपनीच्या जाती पेराव्यात.
एकरी बियाणे, बीजप्रक्रिया : उडीद व मूग दोन्ही पिकांचे ५ किलो बियाणे
प्रतिएकरप्रमाणे पेरावे. पेरणीपूर्वी बियाण्याला रायझोबियम व ट्रायकोडर्मा या
जिवाणूंची बीजप्रक्रिया करावी. मान्सून वेळेत आल्यास जून महिन्यात पेरणी झाल्यास
उत्पादनात वाढ होते. सर्वांत पहिले मूग व उडदाची पेरणी करावी.
खतव्यवस्थापन : फार लवकर येणरी पिके असल्याने पेरणीसोबत २०:२०:००:१३ किंवा
२४:२४:०० किंवा डी.ए.पी. पेरावे. नंतर खत देण्याची आवश्यकता नाही.
आंतरमशागत व तणनाशकाचा वापर : फूल लागण्यापूर्वी डवरणी करावी. गरजेनुसार
निंदण करावे किंवा जमिनीत ओलावा असताना इमॅथिथायपर (परस्यूट) तण १-२ इंचाचे असताना
फवारावे. सोबत शॉकअब वापरावे.
कीड व रोगव्यवस्थापन : रसशोषक किडींपैकी मावा, मुंगे, पांढरी माशी ही
कीड उडीद, मुगावर आढळते. पैकी मावा सुरुवातीला आढळतो. शेंड्यावर व शेंड्याच्या
पानातील रस शोषल्याने वाढ खुटते. पांढरी माशी, यलो मोनॅकचा प्रसार करते. म्हणून
दोन्ही किडींना वेळीच नियंत्रित करावे. त्यासाठी इमिडाक्लोप्रीड किंवा डायमेथोएट
किंवा असिटामाप्रीड फवारावे किंवा सोबत हिरवी उंट अळी/तंबाखूची पाने खाणारी
अळी/स्पंजीड अळी असल्यास ट्रायझोफॉस डेल्टामेथ्रीन/ प्रोफेनोफॉस सायपर/
क्लोरोसायपर यापैकी कोणतेही एक कीटकनाशक फवारावे. यासोबत रसशोषक किडीचे वेगळे
घेण्याची गरज नाही. मात्र, फुलोरा अवस्था असल्यास १२:६१ + झेप व शेंगा अवस्था
असल्यास १३:००:४५ + भरारी द्यावे.
भुरी रोग : पानांवर पांढ-या रंगाची बुरशी आढळते. तीव्रता जास्त असल्यास पाने,
फांद्या व फुलांवर सगळीकडे पसरते व पाने, फुले गळून जातात. याच्या नियंत्रणासाठी
कॅराथेन - १० मिली / टोपाझ - ५ मिली/ सल्फर-४० ग्रॅमपैकी एका बुरशीनाशकाची फवारणी
करावी. गरज भासल्यास १० दिवसांनी परत फवारणी करावी.
यलो मोनॅक : एकदम सर्व पाने पिवळी होतात व त्याचे प्रमाण पहिल्या दिवशी ५ झाडे
दुस-या दिवशी ५०, तिस-या दिवशी ५०० एवढे जोरात वाढते. याचा प्रसार रसशोषक किडीमुळे
होतो. त्यांच्या नियंत्रणासाठी ट्रायझोडेल्टा-४० किंवा असिटामाप्रीड-१२ ग्रॅम
ताबडतोब फवारावे किंवा लागवडीपूर्वी रिहांशची बीजप्रक्रिया करावी.
No comments:
Post a Comment