गहू व्यवस्थापन
गहू पिकाखालील क्षेत्र पाण्याची
साधने वाढत असल्याने दरवर्षी वाढत चालले आहे. मात्र, महाराष्ट्राची उत्पादकता संपूर्ण
देशाच्या तुलनेत फारच कमी आहे. त्यामध्येही काही भाग व काही ठराविक शेतकरी सोडल्यास
गव्हाचे उत्पादन हे खर्चालासुद्धा परवडते का नाही याबद्दल शंका आहे. महाराष्ट्रातील
उष्णता हे एक नैसर्गिक कारण त्यास आहे. मात्र, याव्यतिरिक्त उत्पादनवाढीच्या ज्या गोष्टी
आपल्या हातात आहेत त्या तरी किमान आपण कराव्यात. गव्हामधील बारकावे व महत्त्वाचे मुद्दे
खाली दिले आहेत.
हवामान व पेरणीची वेळ
गव्हाला थंडीचे दिवस जेवढे
जास्त मिळतील तितके पीक वाढीस पोषक ठरून उत्पादनात वाढ होते. गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या
पहिल्या पंधरवड्यात करावी, पेरणीस उशीर झाल्यास ती १५ डिसेंबरपर्यंत करूनही ब-यापैकी
उत्पादन मिळू शकते. मात्र, बरेच शेतकरी त्यानंतरही गव्हाची पेरणी करतात. ज्यामध्ये
अपेक्षित उत्पन्न मिळत नाही.
योग्य वाणाची निवड
गव्हाच्या भरपूर संशोधित
जाती बाजारामध्ये उपलब्ध आहेत. यापैकी आपणास आवडती जात निवडावी. खाजगी कंपन्यांच्यासुद्धा
चांगल्या जाती आहेत. त्यापैकी कावेरी ५१ नं., अजीत १०२ वगैरे जातींचे उत्पादन जास्त
असून खाण्यासाठी नरम आहे. विद्यापीठ संशोधित ए के डब्ल्यू - ३७२२, ए के डब्ल्यू ४६२७,
एच डी २१८९, एम ए सी एस २४९६ किंवा आपल्या पूर्वानुभवानुसार इतर जाती निवडाव्यात.
बियाण्याचे एकरी प्रमाण
गव्हाचे बियाणे एकरी ४० किलो
पेरावे अशी शिफारस आहे. मात्र, काही संशोधित जातींमध्ये फुटव्यांची संख्या जास्त असते,
अशा जाती एकरी ४० किलोपेक्षा कमी पेरल्यासही चांगले उत्पादन मिळते. वेळेवर पेरणीसाठी
हेच प्रमाण ठेवावे. मात्र, उशिरा पेरणीसाठी यामध्ये दीडपट वाढ करावी. बरेच शेतकरी वेळेवरच्या
पेरणीमध्येही एकरी ४० किलोपेक्षा बरेच जास्त बियाणे पेरतात. यामुळे काही विशेष फायदा
होत नाही, तर फुटव्यांची संख्या घटते व विनाकारण बियाण्याचा खर्च वाढतो. वेळेवरच्या
पेरणीसाठी दोन ओळींमध्ये २३ सें.मी. अंतर ठेवावे, तर बागायती उशिरा पेरणीसाठी दोन ओळीत
१५ ते १८ सें.मी. अंतर ठेवावे. बियाणे ५ ते ७ सें.मी.पेक्षा खोल पडणार नाही याची काळजी
घ्यावी.
बीजप्रक्रिया
१०० किलो बियाण्यास २५० मिली.
क्लोरोकॉट क्लोराईड (लिव्होसीन) अधिक १०० ग्रॅम कार्बडायझिम अर्धा लिटर पाण्यात घेऊन
लावावे. अॅझेटोबॅक्टर व पी.एस.बी. ही जिवाणू खते लावावीत व सावलीत सुकवून पेरणी करावी.
क्लोरोकॉट क्लोराईडची बीजप्रक्रिया न केल्यास २१ दिवसांनी २५० मिली. प्रतिएकर रेतीमध्ये
मिसळून पाणी देण्यापूर्वी शेतात समान फेकावे. यामुळे गव्हाची वाढ नियंत्रित राहून गहू
लोळत नाही.
तणनाशकांचा वापर
गव्हामधील रुंद पानांच्या
तणांचे नियंत्रण करण्यासाठी निवडक तणनाशक मेटसल्फुररॉन मिथाईल (अलग्रीप) हे आहे. गहू
पेरणीनंतर साधारणतः २५ दिवसांनी शेतात ओलावा असताना एकरी ८ ग्रॅम वापरायचे. यामुळे
गव्हातील रुंद पानांच्या तणांचे नियंत्रण होईल. अधिक माहितीसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
रासायनिक खते व सूक्ष्म अन्नद्रव्ये
बागायती
गव्हास एकरी ५०:२५:२५ नत्र, स्फुरद व पालाशाची शिफारस आहे. मात्र, अधिक उत्पादनासाठी
साधारणतः एकरी खालील प्रमाणे खते द्यावीत.
ओलित व्यवस्थापन
पेरणीपूर्वी
शेत ओलवून घ्यावे व ढाळणी करून पेरावे. गव्हाच्या काही महत्त्वाच्या अवस्था आहेत ज्यामध्ये
पाण्याचा ताण पडू देऊ नये. आपण ६ वेळा पाणी देऊ शकत असल्यास किंवा त्यापेक्षा कमीपाणी
असल्यास खालील अवस्थांमध्ये पाणी द्यावे.
मात्र, कमी पाणी असल्यास जातींची निवड करताना कमी पाण्यात
उत्पादन देणारी जात निवडावी किंवा पाण्याची शाश्वती नसल्यास गव्हाऐवजी हरभरा पीक घ्यावे.
कीड व रोगव्यवस्थापन
गव्हाला मावा, खोडकिडा, उंदीर
यापासून नुकसान होऊ शकते. माव्याच्या नियंत्रणासाठी इमिडाक्लोप्रीड किंवा थायोमिथाक्झामची
फवारणी खोडकिड्याच्या नियंत्रणासाठी काबारीलची फवारणी करावी व उंदरांसाठी झिंक फॉस्पाईड
हे विषारी औषध उंड्यामध्ये टाकून गोळ्या कराव्यात व वरच्या बाजूने तेल लावून जिवंत
बिळापाशी या गोळ्या टाकाव्यात. तांबेरा रोगाच्या नियंत्रणासाठी झेड-७८ हे बुरशीनाशक
किंवा मॅन्कोझेब या बुरशीनाशकाची फवारणी करावी. गरज असल्यास १० ते १५ दिवसांनी परत
एक फवारणी करावी.
गव्हाच्या दाण्याचा आकार
वाढण्यासाठी १०० लिटर पाण्यामध्ये २ ग्रॅम जी ए (जिब्रेलिक अॅसिड) + ५० मिलीभरारी मिसळून
दाण्याभरण्याच्या अवस्थेत स्टीकर सोबत वापरून फवारावे.
गव्हाच्या ओंब्या पक्व झाल्यानंतर
पाणी देवू नये त्यामुळे दाण्याचा रंग फिक्का होतो व गहू पडू शकतो.
गव्हाच्या काडामध्ये सिलीकॉन
असल्याने काड जाळू नये, बारीक करून १-२ बॅग सुपर फॉस्फेट व अर्धी बंग युरिया मिसळून
त्याला ओलावा असतानी शेतात नांगरून गाडावे.
No comments:
Post a Comment