Search This Blog

कापसाचे फवारणी वेळापत्रक


कापसाचे फवारणी वेळापत्रक

माझा कापसाच्या शेतीतील स्वअनुभव, शास्त्रज्ञांच्या शिफारशी, प्रगतिशील शेतक-यांचे अनुभव, प्रतिपंप फवारणीचा खर्च, एकाच वेळेस अनेक किडींचे नियंत्रण यावर आधारित सर्वसामान्य फवारणी वेळापत्रक पुढील पानावर देत आहे. हे वेळापत्रक प्रत्येक वर्षी जसेचे तसेच लागू होईल, असे सांगता येणार नाही. मात्र, मागील काही वर्षांपासून येणारी कीड, रोग व झाडाच्या अवस्थेनुसार लागणारी संजीवके, विद्राव्य खतांची यामध्ये शिफारस केली आहे. आपल्या आवशक्यतेनुसार याचा वापर करावा. इतर तांत्रिक नावांना पर्यायी व्यापारी नावेसुद्धा समोरच दिली आहेत.
कीटकनाशके व इतर फवारताना पाण्यात मिसळण्यासाठीची शास्त्रीय क्रमवारी खालीलप्रमाणे वापरावीत. त्यांची शॉर्ट फॉर्म, लाँग फॉर्म व उदाहरणे.
१)  WSG/WDG - Water Soluble Granules/WaterDisposal granules उदा. थायोमिथॉक्झाम,
२)     S.P.- Soluble Powders उदा. असिफेट, असिटामाप्रीड
३)     WP/WSP - Wetable Powders उदा. मेन्कोझेब, कार्बडायझीन
४)     SL - Soluble Concentrates उदा. हेग्झाकोनॅझॉल, इंडोझीकार्ब
५)  EC-Emulifiable Conceritrates उदा. क्लोरोपायरिफॉस, क्विनॉलफॉस, फ्रोफेनोफॉस
६) PGR Plant Growth Regulator, Pramoters उदा. ह्युमिक अॅसिड, बायोस्टिमुलंट, नायट्रोबेंझीन
७) WSF - Water Soluble Fertilizers -उदा. १९:१९:१९, युरिया, डी.ए.पी., ई.डी.टी.ए.
टीप-
सल्फर व कॉपर एकत्र किंवा दुस-या कीटकनाशकांसबोत वापरू नका.इतर सर्वांचा वापरसुद्धा तपासून मगच फवारा, द्रावण घट्ट झाल्यास फाटल्यास, योग्य मिश्रण न झाल्यास, न विरघळल्यास फवारू नका. एखादा घटक अयोग्य असल्याने असे होऊ शकते. वरील क्रमवारीनुसार पाण्यात मिसळणे फायद्याचे ठरते. मात्र, प्रत्येक वेळेस हे सर्वच फवारावे असे नाही. शक्य झाल्यास एका पंपाचे मिश्रण तयार करून ते योग्य सिद्ध झाल्यास २०० लिटर पाण्यात द्रावण तयार करावे.





No comments:

Post a Comment