व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धत
विदर्भ-मराठवाड्यात मागील
काही वर्षांत प्रमुख पिके कापूस व सोयाबीन यावरील संकटे वाढत आहेत व उत्पादन खर्च वाढून
उत्पन्न घटत चालले. सध्यातरी सर्वांत कमी खर्च, कमी जोखीम, चांगला परतावा असलेले पर्यायी
पीक तूर ठरू शकते. कारण तुरीचे बियाणे स्वस्त, खतांची गरज कमी व खत उशिरा दिले तरी
चालते. तणनाशक फवारून तण नियंत्रण, फवारणीचा खर्च कमी, मजूर कमी, कोरडवाहू मध्यम भारी
जमीन किंवा बागायती दोन्हीस उपयुक्त व सर्वांत महत्त्वाचे पहिल्यापासून उत्कृष्ट व्यवस्थापन
केल्यास विक्रमी उत्पादन. त्यामुळे हे पीक आशावादी ठरेल.
मात्र, शेतक-यांनी या पिकाला
कधीच मुख्य पिकाचा दर्जा दिला नाही. येईल तेवढे येईल असेच पाहिले. तुरीला हमी भाव जरी
मिळाला व चांगले व्यवस्थापन केले तर सर्वांत फायद्याचे पीक ठरू शकते. त्यासाठी आपली
मानसिकता बदलून तुरीला मुख्य पिकाचा दर्जा द्यावा व लागवड पद्धतीमध्ये थोडे बदल करावेत.
मग प्रत्येक शेतक-यासाठी हे एक आशावादी पीक ठरेल.
जेवढ्या जास्त फांद्या तेवढे जास्त उत्पादन हा तुरीचा उत्पादन वाढवण्याचा सोपा मंत्र आहे.
जेवढ्या जास्त फांद्या तेवढे जास्त उत्पादन हा तुरीचा उत्पादन वाढवण्याचा सोपा मंत्र आहे.
पारंपरिक पद्धतीपेक्षा व्हाईट
गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धतीमध्ये बदल केलेले आहेत, ज्यामुळे तुरीच्या झाडाला खालून
अगदी बुडापासून फांद्या लागतील व भरपूर फांद्या लागतील. हे बदल आपणास नवीन वाटतील;
परंतु व्यवस्थापनामध्ये हे बदल केल्याशिवाय तुरीचे भरघोस उत्पादन घेणेसुद्धा अशक्य
असल्याने सुचविलेल्या पद्धतीने व्यवस्थापन करावे.
अ) निखळ (सलग) तूर लागवड पद्धत : यामध्ये फक्त तूर हे एकच पीक घेतात. मोठ्या शेतक-यांसाठी
ही चांगली पद्धत आहे. दोन ओळींमध्ये ६ फूट अंतर ठेवावे, हे सुरुवातीला जास्त वाटते;
पण ते योग्य आहे व लागवड करताना एक ते दीड फुटावर एक झाड राहील यासाठी ८-१० इंचावर
एक बी व त्याच्या पुढे २-३ इंचावर एक-एक अशा ३-४ बिया लावाव्यात. एकाच ठिकाणी ४-५ बिया
टाकू नयेत. लागवडीसोबत कार्बोफ्युरॉन एकरी २ किलो बियांच्या बाजूला टाकावे. त्यामुळे
कीड, वानु, पक्षी यापासून संरक्षण होते. २५-३० दिवसांनी यापैकी एकच झाड ठेवून इतर झाडे
उपटून टाकावीत व विरळणी करून साधारणतः एक ते दीड फुटावर एक झाड ठेवावे. एक बी लावण्यास
आपली मानसिकता होत नाही; परंतु एका जागेवर जास्त बिया असल्यास विरळणी करताना इतर झाडे
उपटल्यानंतर राहिलेल्या झाडांच्या मुळाला इजा होते, म्हणून तीन-चार बिया लावा. मात्र,
प्रत्येकात २ ते ३ इंच अंतर ठेवावे. बहुतांश शेतक-यांना विरळणी करण्याची इच्छा होत
नाही; परंतु ती न केल्यास खालून (बुडापासून) फांद्या निघत नाहीत व झाडाची उभट वाढ होते.
त्यामुळे विरळणी अवश्य करावी.
ब) मिश्र पीक लागवड पद्धत : तूर हे मुख्यपीक समजून लागवड करावी. तुर असे पीक आहे ज्याच्या
बाजूला अडीच फुटापेक्षा कमी अंतरावर दूसरे पीक असल्यास बुडापासून फांद्या काढत नाही
व त्यासाठी पेरणी करताना तुरीच्या दोन्ही बाजूंनी दुस-या पिकाची एक-एक लाईन पेरू नये
म्हणजे किमान तुरीपासून अडीच ते तीन फुटांवर दुसरे पीक असेल ज्यामुळे तुरीला बुडापासून
फांद्या येतील म्हणजेच जास्त फांद्या जास्त उत्पादन, बेड करायचे असल्यास मध्यम जमिनीमध्ये
आठ फुटांवर बेड करून त्यामध्ये तीनच तासे सोयाबीन, उडीद किंवा मूग अशी पिके घ्यावीत
किंवा भारी जमिनीमध्ये १२ फुटांवर बेड केल्यास मध्ये सहा तासे पेरावीत. यामध्ये अपेक्षित
अंतर ठेवता येते. मधील अंतरामध्ये डवन्याला दोरी बांधून दांड केल्यास आवर्षण परिस्थितीमध्ये
दोन्ही पिकांना पाणी देणे, जास्त पाऊस पडल्यास पावसाचे पाणी वाहून जाणे व उशिरापर्यंत
पिकाची फवारणी करणे शक्य होते. मिश्र पिकांच्या ओळी कमी झाल्यातरी त्याच्या उत्पादनामध्ये
फारशी घट होत नाही; पण तुरीच्या उत्पादनात लक्षणीय वाढ होते. तुरीच्या झाडाला तेवढी
मोकळी जागा मिळाली तरच ते बुडापासून फांद्या काढेल, त्याची खुडणी करता येईल. त्यासाठी
शंका न ठेवता तुरीच्या बाजूचे दुस-या पिकाचे एक-एक तास पेरू नका किंवा ८ फुटांमध्ये
३ किंवा १२ फुटांमध्ये ६ तासेच पेरावीत. मोकळी जागा नंतर फवारणी, पाणी देणे, पाणी मुरवणे
यासाठीसुद्धा कामी पडते व या जागेत तणनाशकांचा वापर केल्यास तणांचा त्रास सुद्धा होत
नाही.
तुरीचे शेंडे कापणे : जास्त फांद्या म्हणजे जास्त उत्पादन यासाठी आपण वरीलप्रमाणे
लागवड केल्याने जमिनीपासून फांद्या लागल्याने फांद्यांची संख्या वाढते. त्यानंतर अजून
जास्तीत जास्त फांद्या लागण्यासाठी वरील पद्धतीच्या लागवडीध्ये पेरणीनंतर ४० दिवसांदरम्यान
शेंडे खुडावेत व जमिनीमध्ये ओलावा किंवा सिंचनाची व्यवस्था असल्यास ७५ ते ८० दिवसांनी
दुस-या वेळेस परत शेंडे विळ्याने कापावेत. त्या वेळेस पावसाळी वातारवण असल्यास साफ
या बुरशीनाशकाची दुस-या कापणीनंतर शेंड्यावर फवारणी करावी. दोन कापण्यांमुळे फांद्यांच्या
संख्येत प्रचंड वाढ होऊन उत्पादन वाढते. मात्र, मिश्र पिकात एक-एक ओळ सोडली नसल्यास
शेंडेसुद्धा खुडता येत नाहीत. म्हणून लागवड पद्धत बदलणे फारच महत्त्वाचेआहे.
वाणांची निवड : तुरीच्या जातीची निवड करताना आपली जमीन, पाणी, मशागत या सर्व गोष्टींचा
विचार करावा. विद्यापीठांच्या शिफारशीत जाती खाली दिल्या आहेत. त्याचे जातिवंत शुद्ध
बियाणे वापरावे. विदर्भामध्ये पांढरी तूर लावत नाहीत व मराठवाड्याच्या काही भागात लाल
तूर घेत नाहीत. दोघांच्या म्हणण्यानुसार त्यांना स्थानिक बाजारपेठेत भाव मिळत नाही.
मात्र, असे नाही पांढ-या व लाल तुरीला सारखाच बाजारभाव असतो. त्यासाठी थोडा ट्रान्सपोर्टचा
खर्च वाढू शकतो. मात्र, जास्त जातींचा पर्याय असल्याने विदर्भामध्ये पांढरी तूर व मराठवाड्यात
लाल तुरीची लागवड सुरू करावी.
पांढरी तूर - बीडीएन-७११ (लकवर/मध्यम कालावधी), बीएसएम आर-८५३ (मध्यम/उशीरा), खडका
(मध्यम)
लाल तूर - पीकेव्ही तारा
(मध्यम कालावधी), बीएसएमआर-७३६ (मध्यम उशिरा), विपुला (मध्यम), आशा (उशिरा सिंचन असल्यास)
या सर्वच जाती उत्कृष्ट आहेत
व कृषी विद्यापीठांच्या शिफारशीत आहेत. याव्यतिरिक्त काही खाजगी कंपन्यांच्या संशोधित
जाती आपला अनुभव चांगला असल्यास निवडू शकता. तूर हे क्रॉस पॉलिनेटेड पीक असल्यामुळे
यामध्ये आनुवंशिक शुद्धता चांगली ठेवणे हे प्रत्येक कंपनीला शक्य होत नाही. त्यामुळे
शेतक-यांना जास्तीत जास्त आनुवंशिक शुद्धतेचे बियाणे मिळावे, यासाठी बुस्टर प्लान्ट
जेनेटिक्स प्रा.लि.च्या माध्यमातून तुरीच्या बी एस एम आर-७३६, पी के व्ही तारा, विपुला,
बी डी एन - ७११ या जाती बाजारात आणल्या आहेत. ज्यांच्या वापराने आपले उत्पादन वाढेल.
बीजप्रक्रिया : तुरीच्या बियाण्याला पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करणे अत्यंत आवश्यक
आहे. त्यासाठी प्रथम रासायनिक बुरशीनाशके कार्बडायझीम १ ग्रॅम व थायरम २ ग्रॅम किंवा
जैविक बुरशीनाशक ट्रायकोडर्मा ५ ग्रॅम प्रतिकिलो बियाण्यास लावावे. त्यानंतर तूर रायझोबियम
व पी.एस.बी. प्रत्येकी २४ ग्रॅम प्रतिकिलो बियाणे प्रमाणे लावून सावलीत सुकवून लागवड/पेरणी
करावी.
ओलित
: हलक्या जमिनीत तुरीचे पीक टाळावे व बागायत असल्यास फुलाच्या सुरुवातीपर्यंत व नंतर
फूल संपत आल्यानंतर पाणी द्यावे. भर फुलात पाण्याचा ताण बसून पाणी दिल्यास मोठ्या प्रमाणात
फुलगळ होते. ठिबक असल्यास फुलोरा अवस्थेत नियमित थोडे थोडे पाणी द्यावे. ताण पडल्यानंतर
पाणी देणे टाळावे किंवा ताणच पडू देऊ नये.
खत व्यवस्थापन
तूर पिकास नत्राची कमी आवश्यकता
असल्याने एकरी १० किलो नत्र व ३० किलो स्फुरद द्यावे. ही गरज साधारणतः डी.ए.पी. एकरी
एक बॅगमधून पूर्ण होते. अधिक उत्पादनासाठी पोटॅशचा वापरसुद्धा फायद्याचा ठरतो व फवारणीतून
विद्राव्य खतांचा व संजीवके, सूक्ष्म अन्नद्रव्यांचा वापर फारच फायद्याचा ठरतो. जमिनीमधून
खत लागवडीसोबत किंवा एक महिन्यापर्यंत देऊ शकतो. सोयाबीनमधील तुरीला सोयाबीन पेरताना
दिलेले खत पुरेसे नंतर सोयाबीन काढल्यानंतर परत डी.ए.पी. द्यायचे असल्यास देऊ शकतो.
विक्रमी उत्पादनासाठी ज्या
शेतक-यांना झेपावेल ते शेतकरी लागवडीसोबत किंवा एक महिन्यापर्यंत खालील घटक जमिनीतून
देऊ शकतात. एक़री प्रमाण - रायझर-जी- ५ किलो, पोटॅश - २५ किलो पी. एस.बी. १ किलो किंवा
अर्धा लिटर के.एम.बी. १ किलो किंवा अर्धा लिटर किंवा एकरी २ लिटर रायझर अर्धा लिटर
ट्रायकोडर्मा, अर्धा लिटर पी.एस.बी. व अर्धा लिटर के.एम.बी.चे ड्रेचिंग लागवडीनंतर
करावे.
कीड व रोग नियंत्रण
तूर पिकावर रसशोषक किडी जसे
तुडतुडा, फुलकिडा, पांढरीमाशी व पिढ्या ढेकून यांचा प्रादुर्भाव काही भागामध्ये आढळतो.
ज्याकडे शेतक-यांचे फारसे लक्ष नसते. मात्र, बारकाईने लक्ष देऊन यापैकी एखाद्या किडीचा
उपद्रव्य वाढल्यास ताबडतोब नियंत्रण करावे. नसता अळ्यांचे योग्य वेळी नियंत्रण करावे.
पाने गुंडाळणारी अळी
पीक फुलावर येण्यापूर्वी
अळी पानाची गुंडाळी करून पाने कुरतडून खाते. पीक फुलो-यावर आल्यानंतर अळी कळ्या, फुले
व शेंगांमधील दाणे खाते. लहान अळ्या कोवळी पाने कुरतडतात.
शेंगा पोखरणारी हिरवी अळी
ही अळी नोव्हेंबर ते मार्च
तुरीवर असू शकते. लहान अळी कोवळी पाने खाते. पीक फुलो-यावर आल्यानंतर कळ्या व फुलेसुद्धा
खाते व शेंगांमध्ये अर्धे शरीर बाहेर ठेवून दाणे खाते.
शेंगमाशी
याची अळी शेंगेत शिरून दाणे
अर्धवट कुरतडून खाते. त्यामुळे दाण्याची मुकणी होते. हे व पिसारी पतंग, मुंगेरे, निळे
फुलपाखरू इत्यादी कीटक तुरीवर येतात.
मर रोग
तुरीसाठी सर्वांत घातक रोग आहे. मात्र, त्याचे पूर्ण नियंत्रण शक्य आहे.
त्यासाठी
अ) तुरीची लागवड बेडवर (वरंबा)
करावी म्हणजे जास्त पाऊस पडला तरी पाणी साचणार नाही. मुळाजवळ पाणी साचल्यास तूर मरते,
वरंब्यावर लागवड केल्यास चिबड/पाणबसन जमिनीमध्येसुद्धा तूर लावणे शक्य आहे.
ब) ट्रायकोडर्मा हे जैविक
बुरशीनाशक आहे. तुरीमध्ये फ्युजेरियम विल्ट हा रोग फार नुकसान करतो. फुलोरा अवस्था
व त्यापुढे झाडे अचानक मरतात. याच्या स्वस्त व प्रभावी नियंत्रणासाठी पेरणीनंतर ट्रायकोडर्मा
एकरी एक किलो किंवा अर्धा लिटरप्रमाणे शेणखतामध्ये चांगला मिसळून ते शेणखत १५-२० दिवसांनी
ओलावा असताना सर्व शेतात फेकावे. ट्रायकोडर्मा फ्रेश व चांगला असावा किंवा एकरी अर्धा
लिटर ट्रायकोडर्माचे ड्रेचिंग करावे.
क) वरील सर्व विद्यापीठ शिफारशीत
जाती मर रोगास सहनशील आहेत. त्यांचा वापर करावा. मात्र, बियाणे गुणवत्तापूर्ण व खात्रीच्या
कंपनीचे वापरावे. या तीन गोष्टी केल्यास मर रोगाचे संपूर्ण नियंत्रण शक्य होते.
फायटोप्थोरा करपा - ज्यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडतो. सतत २-३ दिवस रिमझिम पाऊस असतो तेव्हा या शेंगांवर प्रादुर्भाव वाढतो. पानांवर ओलसर चट्टे व खोडावर तपकिरी चट्टे पडतात. ट्रायकोडर्मा वापरावे.
स्टेम कॅन्कर - खोडावर जमिनीपासून
३-५ इंचांवर किंवा वर डाग पडतात. खोडावर गाठी येतात. काही वेळेस त्या ठिकाणावरून खोड
तुटते. निदर्शनास आल्याबरोबर ब्ल्युकॉपर-३० ग्रॅम + स्ट्रेप्टोसायक्लीन १.५ ग्रॅम प्रतिपंप
खोडावर फवारावे. | (टीप :धुवारी (धुई/धुके) आल्यास सकाळी ६ पूर्वी शेतात जागोजागी ओल्या
व कोरड्या कच-याचे धुपण करावे किंवा सकाळी ६ वाजेपूर्वी विहीर किंवा बोअरच्या ताज्या
पाण्याचा पिकावर फवारा द्यावा. हे शक्य न झाल्यास सुखई किंवा कॉन्टाफ प्लस हे बुरशीनाशक
ताबडतोब फवारावे.)
वांझ रोग
हा विषाणूजन्य रोग आहे. यामुळे
झाडाची वाढ खुटते. झाड झुडपासारखे दिसते. पानावर पिवळे गोलाकार ठिपके पडतात. झाडावर
अत्यंत कमी किंवा मुळीच शेंगधारणा होत नाही. विदर्भामध्ये प्रचलित मारोती या जातीमध्ये
या रोगाचे प्रमाण जास्त आढळते.
या सर्वच रोगावर उपाय म्हणजे बीजप्रक्रिया करणे, रोग प्रतिकारक्षम
जातींची लागवड करणे, ट्रायकोर्डमाचा वापर करणे, शिफारशीत बुरशीनाशक फवारणे व वरंब्यावर
तुरीची लागवड करणे हे आहेत.
तूर फवारणी वेळापत्रक
तूर फवारणी
उत्पादन वाढीसाठी योग्य अवस्थेमध्ये
तुरीला तीन फवारे द्यावेत व त्यामध्ये आवश्यकतेनुसार शिफारशीत संजीवके व विद्राव्य
खतांचा वापर केल्यास उत्पादनामध्ये भरीव वाढ होते. मात्र, अवस्थेनुसारच शिफारसीत औषधे
वापरावीत. त्याला पर्यायी औषधे वापरल्यास अपेक्षित फायद्याची खात्री घेता येणार नाही.
तसेच * आहे तिथे गरज असल्यासच त्याचा वापर कराव. कमी खर्चाची मात्र रसशोषक किडींनासुद्धा
नियंत्रण करणारी अळीनाशके ट्रायझोफॉस + डेल्टामेथ्रीन (हॅकर/शिकारी), प्रोफेनोफॉस
+ सायपरमेथ्रीन (सरेंडर/प्रोफेक्ससुपर), क्लोरोपायरिफॉस + सायपरमेथ्रीन (हमला/न्युरेल
डी), क्लोरोपायरिफॉस + अल्फामेथ्रीन यांचे प्रमाण प्रतिपंप ४० मिली किंवा एकरी ३००
ते ४०० मिली., दिर्घकाळ नियंत्रण पण रसशोषक किडीचे नियंत्रण नाही, अशी महागडी अळीनाशके
कोराजन ५ मिली किंवा हमर-५ मिली किंवा फेम-४ मिली टाकूमी किंवा इमामेक्टीन १० ग्रॅम
प्रतिपंप.
No comments:
Post a Comment