Search This Blog

व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे उपक्रम


व्हाईट गोल्ड ट्रस्ट चे उपक्रम(सेवाभावी संस्था)
     कृषिसाक्षरतेमधून शेतक-यांचा विकास

लेखकाच्या अल्प परिचयामध्ये सांगितल्याप्रमाणे जास्तीत जास्त शेतक-यांपर्यंत व प्रमुख पिकांची अचूक, आधुनिक तांत्रिक माहिती वेळोवेळी देऊन शेतक-यांच्या ज्ञानामध्ये भर पाडून शेतक-यांचा विकास करणे हा उद्देश ठेवून या पुस्तकाचे लेखक श्री. गजानन जाधव यांनी अनेक कृषितज्ज्ञ, पीक विशेषज्ञांच्या मदतीने या सेवाभावी संस्थेची स्थापना केली. या ट्रस्टच्या माध्यमातून वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबविले जातात. जसे सव्वालक्ष शेतक-यांना पावसाळ्यात दर सोमवारी, हिवाळ्यात एक सोमवार आड व उन्हाळ्यात चार पैकी एक सोमवार हवामानाचा अंदाज व कृषीसल्ला देण्यात येतो. कापूस उत्पादक जिल्ह्यांमध्ये व्हॉटस अॅप ग्रुप तयार करून शेतक-यांच्या प्रश्नांवर व अडचणींवर योग्य मार्गदर्शन केले जाते. उन्हाळ्यामध्ये खरीप पिकांच्या व्यवस्थापनाबद्दल प्रशिक्षण वर्ग आयोजित करून हजारो शेतक-यांना तांत्रिक माहिती व पीक नियोजनाबद्दल मार्गदर्शन करण्यात येते. जुलै, ऑगस्ट महिन्यामध्ये पिकांवरील कीड व रोगांची ओळख व त्यावरील उपाययोजनांसाठी पिक पाहणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. सप्टेंबर, ऑक्टोबर महिन्यांमध्ये रबी पिकांचे चर्चासत्र आयोजित करण्यात येतात. नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यामध्ये ऊस, संत्रा, मोसंबी व इतर पिकांचे मार्गदर्शन व चर्चासत्रांचे आयोजन करण्यात येते. मागील दोन वर्षांमध्ये दुष्काळी बीड जिल्ह्यामधील गरजू शेतक-यांना मोफत बियाणे वाटप आयोजित करण्यात आले. यावर्षी कापसावरील गुलाबीबोंड अळी या अनपेक्षितरीत्या वाढलेल्या किडींबद्दल वर्तमानपत्रात लेख देण्यात आले. व्हाईट गोल्ड पॅटर्न तूर लागवड पद्धतीचे पीक पाहणी कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इतर सेवाभावी संस्थांसोबत शेतकरी प्रशिक्षणांचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. एक लक्ष शेतकरी दिनदर्शिका ज्यांच्या प्रत्येक पानाच्या मागे शेती उपयुक्त माहिती छापून शेतक-यांना देण्यात आली. ऊसव्यवस्थापन, संत्रा व मोसंबी व्यवस्थापनाची माहितीपत्रके छापून गरजू शेतक-यांना देण्यात आली. काही जिल्ह्यांमध्ये कृषिविक्रेत्यांचे प्रशिक्षण वर्ग आयोजित करून कृषीनिविष्ठा कीड, रोग व भविष्यातील संभाव्य अडचणींबद्दल माहिती देण्यात आली. शेतक-यांना काहीही तांत्रिक अडचण आल्यास त्यांना ताबडतोब माहिती मिळावी यासाठी शेतकरी साहाय्यता फोन नंबर देऊन वर्षभर माहिती दिली जाते.
हे सर्वच उपक्रम यापुढेही सुरू राहतील, तसेच याव्यतिरिक्त भविष्यामध्ये इतर अनेक शेतकरी हिताच्या उपक्रमांचे आयोजन करण्याची आमची इच्छा आहे. आपणास आमची एस एम एस सुविधा सुरू करण्यासाठी आपले नाव व जिल्हा सांगून आमच्या शेतकरी साहाय्यता क्रमांक ८८८८१६७८८८ वर नोंदणी करावी. हे एस एम एस मोफत पाठविले जातात. तसेच कुठल्याही तांत्रिक अडचणीसाठी याच क्रमांकावर कॉल करू शकता. आपणास व्हॉटस् अॅप ग्रुपमध्ये सामील व्हायचे असल्यास ग्रुपवर फक्त शेतीविषयी माहिती घेण्याची मानसिकता असल्यास आपल्या जिल्हा प्रतिनिधींना व्हॉटस् अॅप मॅसेज पाठवून आपले नाव, गाव, तालुका व जिल्हा कळवावा. ते ग्रुपमध्ये अॅड करतील. मात्र, नियम न पाळल्यास काढूनसुद्धा टाकतील. या पुस्तकाच्या प्रती पाहिजे असल्यास काही मोजक्या कृषिकेंद्रांवर त्या उपलब्ध आहेत किंवा आमच्या जिल्हा प्रतिनिधीशी संपर्क करून आपण प्रत मिळवू शकता. आपल्या काही सूचना, संदेश, अभिप्राय आपण आमच्या शेवटच्या पानावरील पत्त्यावर पोस्ट, कुरिअर किंवा ई-मेल द्वारे कळवू शकता.







    

No comments:

Post a Comment